#न्यूज #वार्ता
नसरापूर येथे दि.25 गुरुवारी रोजी बाजार गाळ्यांचे उद्घाटन.
नसरापूर (प्रतिनिधी)
भोर आणि वेल्हे तालुक्यातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या नसरापूर या ऐतिहासिक बाजारपेठेत भोर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नसरापूर उपबाजार आवारातील 45 व्यापारी गाळ्यांच्या उद्घाटन आणि अंतर्गत रस्ते व गटारांचे व 80 भाजी मंडई ओट्यांचे भूमीपूजन गुरुवार दि. 25 रोजी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या हस्ते व मा. मंत्री अनंतराव थोपटे व आमदार संग्राम थोपटे यांच्या उपस्थितीत होणार आहे.
कृषी उत्पन्न बाजार समिती भोरचे सभापती अंकुश खंडाळे,उपसभापती सोमनाथ निगडे, मा. उपसभापती संपत आंबवले, संचालक संदीप चक्के व गुंजवणी पाणी समितीचे सचिव अरविंद सोंडकर यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. शेतकरी व्यापारी व नागरिकांना या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
