नसरापूर येथे आय. आय. एफ. एल गोल्ड लोन शाखेचा उद्घाटन समारंभ संपन्न .

Maharashtra varta

 आय. आय. एफ. एल गोल्ड लोन शाखेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना  मदत  होईल. अनिल नाना सावले.




नसरापूर (प्रतिनिधी)

आय. आय. एफ. एल गोल्ड लोन  चे  संपूर्ण देशात महाराष्ट्र राज्य विस्तार होत असताना पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथे शाखा उभी राहत असताना याचा आम्हा सर्व शेतकरी बांधवांना व तमाम नागरिकांना आनंद होत आहे. तत्परतेने कर्ज मिळण्याची हमी आणि इतर बँकांपेक्षा  कमी व्याजदर व कमीत कमी कागदपत्रांमध्ये कर्जदाराला कर्ज उपलब्ध होण्याचे प्रभावी साधन आयआयएफएल फायनान्स गोल्ड लोन शाखेच्या माध्यमातून होत आहे. यासाठी येथील शेतकरी बांधवांनी आयआयएफएल फायनान्स गोल्ड लोन जास्तीत जास्त फायदा घेऊन आपली कामे करून आर्थिक सुबत्ता कशी वाढेल, याकडे जास्तीत जास्त लक्ष द्यावे असे आवाहन भोर तालुक्याचे युवा नेते व जनसेवक अनिल नाना सावले यांनी व्यक्त केले.

नसरापूर ता. भोर येथे आय एफ एल च्या शाखेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.आय. आय. एफ. एल गोल्ड लोन शाखा उदघाटन जनसेवक आणि युवा उदयोजक अनिल नाना सावले यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत झाले.

सावले पुढे बोलताना म्हणाले की,नसरापूर गावातील सर्व व्यापारी वर्ग आणि शेतकऱ्यांना या नसरापूर या शाखेच्या माध्यमातून जास्तीत जास्त फायदे होतील, स्थानिक लोकांना रोजगार मिळेल, स्थानिक लोकांना रोजगार मिळेल  आणि आयआयएफएल फायनान्स गोल्ड लोन नसरापूर शाखेच्या पुढील वाटचालीस  अनिल नाना सावले यांनी शुभेच्छा दिल्या

  आय. आय .एफ .एल मध्ये फक्त गोल्ड वरतीच लोन दिले जात नाही, तर इतर सर्व प्रकारची लोन या  ठिकाणी मिळणार आहेत. कमीत कमी वेळेत, कमीत कमी खर्चात कमीत कमी कागदपत्रांमध्ये शेतकऱ्यांना  कर्ज उपलब्ध करून शेतकऱ्यांना अधिकाधिक सहकार्य या माध्यमातून केले जाणार असल्याची माहिती यावेळी आय. आय. एफ. एल गोल्ड लोनचे रिजिनल हेड संतोष भोसले यांनी दिली.

या  कार्यक्रम प्रसंगी नसरापूर सरपंच रोहिणीताई शेटे, भोर बाजार समितीचे संचालक ज्ञानेश्वर झोरे,मा. सरपंच शंकर तात्या शेटे,आय. आय. एफ. एल गोल्ड लोन फायनान्स गोल्ड लोनचे रिजिनल हेड संतोष भोसले,जावेद मुलानी, स्वप्नील साळुंखे, संतोष साबत ,प्रशांत गायकर, देवेंद्र पावसे, सुरज बोरगे, हरिष सूर्यवंशी, कोमल झुंगारे,इरफान मुलाणी,सामाजिक कार्यकर्ते विजूकाका जंगम , यावेळी उपस्थित होते. 

आय. आय. एफ. एल गोल्ड लोन च्या शाखा  संपूर्ण भारत देशात शाखांचे विस्तारित जाळे निर्माण झालेले आहे. देशात दोन हजार पेक्षा अधिक शाखा आहेत.. त्यातील महाराष्ट्र राज्यात अडीचशेहून अधिक शाखा कार्यान्वित आहेत.

या कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन प्रसिद्ध निवेदक विठ्ठल पवार यांनी केले.तर आभार जावेद मुलानी यांनी मानले.
To Top