पूर आपत्ती मध्ये निराधार झालेल्या वारसाना आपती व्यवस्थापन अंतर्गत आर्थिक मदत.

Maharashtra varta

 पूर आपत्ती मध्ये निराधार झालेल्या  वारसाना आपती व्यवस्थापन अंतर्गत आर्थिक मदत.


नसरापूर (प्रतिनिधी):-

२२ जुलै २०२१ रोजी भोर तालुक्यातील भुतोंडे गावचे अंकुश उत्तेकर यांचे पुरात वाहून गेल्याने निधन झाले. त्यामुळे निराधार झालेल्या त्यांच्या वारसाना आपती व्यवस्थापन अंतर्गत  मुलगा अजय व मुलगी सुप्रिया यांना भोर वेल्हा मुळशीचे  आमदार संग्राम थोपटे यांच्या माध्यमातून आणि स्थानिक जिल्हा परिषद सदस्य विठ्ठल आवाळे यांनी केलेल्या विशेष प्रयत्नातून रु.४ लक्ष मदत सदर मृत व्यक्तीच्या वारसांना मिळवून दिली. या मदतीचे धनादेश त्यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले.

     त्याचप्रमाणे मुख्यमंत्री सह्य्यता निधीमधून रु.१ लक्ष व कुटुंब सह्य्यता निधीमधून रु.२० हजार मदत मिळवून देण्यासाठी विशेष प्रयत्न करणार असल्याचे आमदार संग्रामदादा थोपटे यांनी सांगितले.

        यावेळी तहसीलदार अजित पाटील,यांचेसह भूतोंडे गावचे मा.सरपंच संतोष उफाळे,व मा.उपसरपंच प्रकाश मोरे,विकास कदम उपस्थित होते.

To Top