कात्रज येथील स्वामी ज्वेलर्सचे मालक पाल व जंगम यांनी 1 कोटी रुपयांची फसवणूक करून झाले फरार.

Maharashtra varta

 कात्रज येथील स्वामी ज्वेलर्सचे  मालक  पाल  व जंगम यांनी 1 कोटी रुपयांची फसवणूक करून झाले फरार.

राजगड पोलीस स्टेशन,नसरापूर येथे  गुन्हा दाखल.





पुणे  (प्रतिनिधी )

स्वामी ज्वेलर्स, कात्रजचे मालक महालिंग जंगम व सुब्रत पाल यांनी भागीदार दिलीप यादव यांची 1 कोटी रुपये रक्कम स्वतःच्या आर्थिक फायद्याकरिता वापरली हे लक्षात येताच फिर्याद दार दिलीप यादव यांनी राजगड पोलीस स्टेशन नसरापूर येथे तक्रार दिली. राजगड पोलीस स्टेशनने  स्वामी ज्वेलर्स, कात्रजचे मालक महालिंग जंगम व सुब्रत पाल यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.महालिंग जंगम व सुब्रत पाल हे दोघेही फरार असून राजगड पोलीस त्या दोघांचा कसून शोध घेत आहे.

राजगड पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार ,रियल इस्टेट व  कन्स्ट्रक्शन मधील प्रसिद्ध उद्योजक दिलीप यादव रा. मोरदरी ता. हवेली जि.पुणे, महालिंग शिवलिंग जंगम रा.वसुंधरा सोसायटी फ्लॅट नंबर ८ भारती विद्यापीठ पुणे , सुब्रत पाल रा. फ्लॅट नंबर २०६ (बी विंग ) राज टॉवर संतोष नगर भाजी मंडई शेजारी कात्रज पुणे.

यांनी स्वामी ज्वेलर्स, या नावाने  कात्रज, पुणे येथे या तिघामध्ये  सोने चांदीच्या दुकानाच्या व्यवसायासाठी भागीदारी मध्ये दिलीप यादव यांनी वेळोवेळी १ कोटी रूपयांची गुंतवणूक केली होती.भागीदारी व्यवसायातील पैसा उर्वरित दोघांनी महालिंग जंगम व सुब्रत पाल यांनी स्वताःच्या आर्थिक फायद्यासाठी वापरून दिलीप यादव यांची १ कोटी रूपयांची फसवणूक करून भागीदारी करार मोडून दिलीप यादव यांनी दिलेले पैसे मागितले असताजंगम व पाल यांनी  त्यांना दमदाटी केली, दिलीप यादव यांची फसवणूक झाली आहे.  महालिंग जंगम व सुब्रत पाल या दोघावर फसवणूकीचा गुन्हा राजगड पोलीस ठाण्यात नोंदविला आहे.

राजगड पोलीसांना विचारले असता, पाल व जंगम फरार आहे. त्यांचा शोध व चौकशी चालू असल्याची माहिती दिली. पुढील तपास राजगड पोलीस ठाण्याचे निरिक्षक संदिप घोरपडे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार संतोष तोडकर करीत आहे.

सुब्रत पाल व महालिंग जंगम यांनी अन्य कोणत्याही व्यक्तीची अशी फसवणूक केली असेल तर त्यांनी राजगड पोलीस ठाण्यात येऊन तक्रार द्यावी ,असे आवाहन करण्यात आले.

To Top