भोर तालुका शिवसेना समन्वयकपदी नितीन इंगुळकर यांची निवड
नसरापूर (प्रतिनिधी):-
भोर तालुका शिवसेना समन्वयक पदी कामथडी गावचे नितीन इंगुळकर यांची नुकतीच निवड करण्यात आली.
मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाने शिवसेना नेते पर्यावरण मंत्री युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी बारामती लोकसभेतील भोर व दौंड विधानसभेच्या युवा सेनेच्या पदाधिकारी पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर केल्या.त्या नियुक्त्या मधील भोर तालुक्याच्या संघटकपदी नितीन इंगुळकर यांची निवड केलेली आहे .नितीन इंगुळकर गेले अनेक वर्ष शिवसेनेच्या माध्यमातून कामथडी व पंचक्रोशी परिसरात शिवसेनेच्या माध्यमातून काम करीत आहेत.
त्यांच्या निवडीबद्दल पुणे जिल्हा युवा सेनेचे अध्यक्ष व पदाधिकारी तसेच भोर विधानसभा युवा सेनेचे पदाधिकारी तसेच जिल्हा व भोर तालुक्याचे शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

