सैनिक भरतीतील युवकांना कोव्हीड लसीकरण उपलब्ध करा:-प्रहार जनशक्ती पक्षाची मागणी.
पुणे ( प्रतिनिधी):-
सैनिक भरती मध्ये सहभाग घेऊ इच्छित तरुणांना प्राधान्याने कोविड लसीकरण उपलब्ध करून द्या अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्षाचे मंगेश ढमाळ यांनी पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
त्या निवेदनात असे म्हटले आहे की सप्टेंबर 2021 मध्ये अनेक वर्ष न घेण्यात आलेली सैनिक भरती घेण्यात येणार आहे. आपल्या पुणे जिल्ह्यामध्ये अनेक युवक सैन्य भरती आपले भविष्य बनवू इच्छित आहेत. परंतु सुरू असलेल्या कोरोना महामारी च्या वर्षात घेण्यात येणारी सैनिक भरतीत लसीकरण अनिवार्य करण्यात आलेले आहे.
सदर लसीकरण घेण्यास सर्व भरती पात्र युवक तयार असूनही लसीच्या कमी पुरवठा यामुळे अनेक तरुणांना लसीकरणापासून वंचित राहावे लागत असल्याने केवळ प्रशासनाच्या दिरंगाईमुळे अनेक तरुणांच्या भरतीस मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. तरी सर्व सैन्य भरतीतील युवकांना प्राधान्य कोविड लसीकरण देण्यात यावे .जेणेकरून सर्व युवक आपले इच्छित स्वप्न सत्यात उतरू शकतील.
यावेळेस राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांचे स्वीय सहाय्यक गौरव जाधव जिल्हा उपाध्यक्ष मंगेश ढमाळ,युवा कार्याध्यक्ष संतोष साठे,युवा पुरंदर तालुका अध्यक्ष आकाश सणस,रोहित लकडे,पांडुरंग शिळीमकर, आबा शिळीमकर आदी उपस्थित होते.

