गणेश जागडे यांचे काम युवा पिढीला प्रेरणा देणारे :-आमदार संग्राम थोपटे.
मार्गासनी ( वार्ताहर):-
सामाजिक व राजकीय क्षेत्रात कायम समाजाच्या उन्नतीसाठी झटत राहून झोकून देऊन काम करीत राहणाऱ्या व्यक्ती समाजमनावर राहतात. याचे उत्तम उदाहरण म्हणजे वेल्हे तालुका युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष गणेश जागडे पाटील हे आहेत .गणेश जागडे पाटील यांचे सामाजिक, राजकीय काम युवा पिढीला प्रेरणा देणारे आहे. असे प्रतिपादन 'भोर वेल्हा मुळशीचे आमदार संग्राम थोपटे 'यांनी केले.
अडवली ता. वेल्हा येथे "ज्ञानेश्वर मंगल कार्यालयात "वेल्हे तालुका युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष गणेश जागडे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त ' वेल्हे तालुका काँग्रेस ,वेल्हे तालुका युवक काँग्रेस व गणेश शेठ जागडे युवा मंचच्या वतीने वेल्हा तालुक्यात उत्कृष्ट काम करणाऱ्या सर्व आशा वर्कर,मदतनीस व अंगणवाडी सेविका व वेल्हा तालुक्यातील पत्रकारांचा "कोव्हीड योद्धा" पुरस्कार सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता.
त्या कार्यक्रमाप्रसंगी आमदार थोपटे बोलत होते.वेल्हे युवक काँग्रेस उपाध्यक्ष म्हणून गणेश जागडे यांनी वेल्हा तालुक्यात काँग्रेस पक्षाचे विचार तळागाळापर्यंत युवकांपर्यंत पोहोचवण्याचे काम केले आहे. त्यांना मदत व सहकार्य करणारे युवक अध्यक्ष शिवराजबापू शेंडकर यांचे देखील काम उत्कृष्ट असून गणेश जागडे यांनी आजपर्यंत आयोजित केलेले उपक्रम व दिलेले योगदान व आज आयोजितकेलेला कोव्हीड योद्धा सन्मान सोहळा हा खरोखरच समाजाला व समाजातील प्रत्येक घटकाला दिशा आणि प्रेरणा देणारा आहे.
केवळ निवडणुका डोळ्यासमोर न ठेवता समाजाच्या हिताचे, सामाजिक बांधिलकीचे उपक्रम गणेश जागडे हे राबवत आहेत. आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीमध्ये तिकीट देत असताना गणेश जागडे यांच्या या सर्व कामांचा विचार करून त्यांना संधी देण्यासारखे काम त्यांच्या हातून होत आहे. वेल्हे तालुका काँग्रेस याची निश्चितच दखल घेतील, असे आमदार संग्राम थोपटे यांनी सुतोवाच केले.
या कार्यक्रमास वेल्हा पंचायत समिती सभापती दिनकर सरपाले, जिल्हा परिषद सदस्य दिनकरराव धरपाळे, जिल्हा परिषद सदस्य अमोल शेठ नलावडे ,वेल्हे तालुका काँग्रेस अध्यक्ष नानासाहेब राऊत, वेल्हे पंचायत समिती मा. उपसभापती चंद्रकांत शेंडकर, राजगड सहकारी साखर कारखाना संचालक संदीप नगीने,मा. सभापती सीमाताई राऊत,वेल्हे तालुका काँग्रेस सेवादलाचे अध्यक्ष आकाश वाडघरे ,मा. सभापती डॉ. संभाजी मांगडे,डॉ. बालाजी कल्याणे, अनंता शेंडकर,संभाजी भोसले,भोर तालुका युवक काँग्रेस कार्याध्यक्ष महेश टापरे, सोमनाथ निगडे,अनिल सावंत ,डॉ. जितेंद्र जाधव व इतर सर्व मान्यवर व विविध गावचे सरपंच व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक वेल्हे तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज बापू शेंडकर यांनी केले, तर या कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन प्रसिद्ध निवेदक विठ्ठल पवार यांनी केले. उपस्थितांचे आभार भोर विधानसभा युवक उपाध्यक्ष अमोल अण्णा पडवळ यांनी मानले.
वेल्हे तालुका काँग्रेस पक्ष व वेल्हे तालुका युवक काँग्रेस आणि गणेश शेठ जागडे पाटील युवा मंचचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते व मित्र परिवार यांनी विशेष परिश्रम घेतले.

