साखर मध्ये मोफत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न.
छत्रपती सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल,नसरापूरयांचा स्तुत्य उपक्रम.
नसरापूर ( प्रतिनिधी)
छत्रपती सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल,नसरापूर यांच्या वतीने लोकमान्य टिळक पुण्यतिथीनिमित्त वेल्हे तालुक्यातील साखर येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरास नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. हे शिबीर यशस्वी रित्या आम्ही पार पाडले असल्याची माहिती छत्रपती सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल,नसरापूरचे संचालक डॉ. संभाजी मांगडे यांनी दिली.
रविवार दि. 1 ऑगस्ट 2021 रोजी साखर वेल्हा येथे सकाळी दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत या आरोग्य शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिरात शुगर तपासणी, बी. पी. तपासणी,डोळ्यांची तपासणी,अस्थीरोग तपासणी,महिलांची आरोग्य तपासणी, व सर्व प्रकारच्या तपासण्या मोफत विनामूल्य करण्यात आल्या. यांनतर कराव्या लागणाऱ्या शस्त्रक्रिया कमीत कमी किमतीत करणार असल्याचे सांगितले.पुढील महिन्यात देखील असेच मोफत शिबीर गावोगावी होणार असल्याचे यावेळेस सांगितले.
साखर पंचक्रोशी परिसरातील नागरिकांनी व माता भगिनींनी या मोफत आरोग्य शिबिराला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला.
संतोषभाऊ रेणुसे, विकास नलावडे,शंकरभाऊ रेणुसे,बाळासाहेब रसाळ,संजय वालगुडे, भरत आण्णा रांजणे,सिकंदर शेख,लक्ष्मण मालुसरे आदी मान्यवर उपस्थित होते.
यासाठी तज्ञ डॉक्टर डॉ. संभाजी मांगडे,डॉ. बालाजी कल्याणे,डॉ. अविराज, डॉ. सोनाली ,डॉ. सचिन मुळे, डॉ. विश्वास ,डॉ. जगन्नाथ कंधारे उपस्थित होते.

