सन 2022 मध्ये प्रहार पक्ष पुणे व पिंपरी चिंचवड महानगर पालिका निवडणूका लढवणार:-

Maharashtra varta

 सन 2022 मध्ये प्रहार पक्ष पुणे व पिंपरी चिंचवड  महानगर पालिका निवडणूका लढवणार:-


पुणे( प्रतिनिधी):-

सन 2022 मध्ये पुणे महानगरपालिका व पिंपरी चिंचवड महानगर पालिका निवडणुकीत प्रहार जनशक्ती पक्ष मोठ्या ताकदीने निवडणूक लढवणार असून कार्यकर्त्यांनी निवडणुकीसाठी सज्ज राहावे,   प्रहारचे सामाजिक व राजकीय काम जनतेच्या जनतेपर्यंत व तळागाळातल्या प्रत्येक माणसापर्यंत पोहोचवा, असे आवाहन राज्यमंत्री आमदार बच्चू कडू यांनी यावेळेस केले आहे.


प्रहार जनशक्ती पक्ष ,संस्थापक अध्यक्ष राज्यमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू भाऊ कडू यांची मुंबई मंत्रालय येथे प्रहारच्या कार्यकर्त्यांनी भेट घेतली,त्यावेळेस राज्यमंत्री कडू बोलत होते.

   यावेळेस पुणे  जिल्हा प्रहार  युवक कार्यकारिणी विस्ताराबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच युवा कार्यकारणी च्या विस्तारासाठी सुयोग्य कार्यकर्त्यांची निवड करून आपल्या कामाची उंची वाढवावी.प्रहार पक्षात व समाजात योगदान देणाऱ्या कार्यकर्त्यास पदाच्या माध्यमातून न्याय द्या,असे बच्चूभाऊ कडू यांनी सांगितले.

यावेळेस प्रहारचे प्रदेश अध्यक्ष अनिल गावंडे, राज्यमंत्री बच्चू कडू यांचे स्वीय सहाय्यक गौरव जाधव व राज्याचे नेते अजय बारस्कर, पुणे जिल्हा युवा अध्यक्ष अजिंक्य बारणे, पुणे जिल्हा युवा कार्याध्यक्ष संतोष आप्पा साठे ,पुणे जिल्हा उपाध्यक्ष वैभव भोसले ,पुरंदर तालुका अध्यक्ष आकाश सणस प्रहारचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

To Top