शिवशंभो वेल्फेअर फाऊंडेशनचे वतीने पूरग्रस्तांना होणार वस्तूचे वाटप.
पुणे ( प्रतिनिधी):-
पाटण जि. सातारा येथील पूरग्रस्तांना आपल्या यथायोग्य शक्तीनुसार पूरग्रस्तांना "एक हात मदतीचा, एक हात सहकार्याचा" त्यासाठी आपल्या सर्वांचे साथ असणे अपेक्षित आहे. चला तर मग आपण पूरग्रस्तांना मदत करून आपल्या बांधवांना सहकार्य करू या, असे आवाहन शिवशंभो वेल्फेअर फाऊंडेशनचे अध्यक्ष तथा प्रहार जनशक्ती पक्ष पुणे जिल्ह्याचे आदर्श रुग्णसेवक रामभाऊ तारसे व त्यांच्या सुविद्य पत्नी तथा शिवशंभु वेल्फेअर फाउंडेशनच्या संस्थापिका सौ. प्रियंका तारसे यांनी केले आहे.
राज्यमंत्री नामदार बच्चुभाऊ कडू यांच्या मार्गदर्शनाखाली व त्यांचे स्वीय सहाय्यक गौरव दादा जाधव यांच्या कुशलतेने व पुणे जिल्ह्याचे आदर्श रुग्णसेवक नयन भाऊ पुजारी यांच्या विचाराने रामभाऊ तारसे व सौ. प्रियंका तारसे यांनी पूरग्रस्तांना अन्नधान्य तसेच दैनंदिन जीवनात लागणाऱ्या आवश्यक वस्तू साहित्याचे वाटप त्यांच्या माध्यमातून होणार आहे.
समाजातल्या दानशूर व्यक्तींनी आपल्या बांधवांसाठी पुढे यावे असे आवाहन त्यांनी केले आहे. यातून टूथ ब्रश टूथपेस्ट आंघोळीचे व कपड्याचे साबण टॉवेल, अंगवस्त्र, चादर, मच्छर अगरबत्ती माचिस, सुका खाऊ, बिस्किट, फरसाण वगैरे व चप्पल डाळ ,तांदूळ ,मीठ ,तेल तिखट इत्यादि गृह उपयोगी साहित्य प्रत्येकाने द्यावे असे आवाहन केले आहे.

