राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार विजेते भीमराव शिंदे सर यांनी भोर पत्रकार पदाधिकाऱ्यांचा केला सम्मान.

Maharashtra varta

राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार विजेते भीमराव शिंदे सर यांनी केला ,भोर पत्रकारांचा  सत्कार.


भोर (प्रतिनिधी):-

 महाराष्ट्र राज्य शासनाचा आदर्श शिक्षक  पुरस्कार विजेते भीमराव शिंदे  सर यांनी सामाजिक बांधिलकी जपणारे भोर तालुक्यातले  आदर्श पत्रकार तथा भोर तालुका पत्रकार संघाच्या झालेल्या निवडणुकीत निवड झालेल्या पत्रकार पदाधिकाऱ्यांचा सत्कार कार्यक्रम नसरापूर येथे संपन्न झाला .

भोर तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष वैभवजी भुतकर व तालुका पत्रकार संघाचे उपाध्यक्ष माणिकराव पवार व जिल्हा कार्यकारिणी निवड झालेले किरण भदे  व इतर पत्रकार बांधवांना सन्मान करण्यात आला.

या प्रसंगी शिक्षक नेते शिवाजीराव जाधव सर व विजू काका गयावळ उपस्थित होते.

To Top