पं.जवाहरलाल नेहरु आवास योजना झोपडपट्टी पुनर्वसन केलेल्या घरांवर कर्ज मिळावे:- प्रहार जनशक्ती पक्षाचे आयुक्तांना निवेदन.

Maharashtra varta

 पं.जवाहरलाल नेहरु आवास योजना झोपडपट्टी पुनर्वसन केलेल्या घरांवर कर्ज मिळावे:-

प्रहार जनशक्ती पक्षाचे आयुक्तांना निवेदन.



पुणे( प्रतिनिधी)

पं.जवाहरलाल नेहरु आवास योजना झोपडपट्टी पुनर्वसन केलेल्या घरांवर कर्ज मिळावे अश्या आशयाचे निवेदन प्रहार जनशक्ती पक्षाचे पिंपरी चिंचवड शहर प्रमुख विनोद गायकवाड पुणे जिल्हा संघटक नीरजभाऊ कडू व  विशाल कांबळे यांनी दिले.


निवेदनात असे म्हटले आहे की,अजंठा,नगर,ओटास्किम,बौध्दनगर पिंपरी, विठ्ठल नगर अशा भागात हा प्रकल्प आहे ,आणि ज्या पध्दतीने फ्लॅट धारकांना जर कर्ज हवे असेल, तर त्यांना तो मॉरगेज करून लोन घेऊ शकतो, त्याच प्रमाणे या प्रकल्पातील घर मालकांना बँके द्वारे लोन नाकारले जाते .ज्यांना गरज आहे अशाना पालिकेने ना हरकत पत्र देऊन ज्याठिकाणी पालिकेच्या ठेवी आहेत, अशा बँकेस लोन मजूंर करू देण्यास सांगावे ,या साठी  पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त राजेश पाटील यांना प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने निवेदन देण्यात आले.हे निवेदन पिंपरी चिंचवड शहर प्रमुख  विनोद गायकवाड यांच्या लेटरहेड वर देण्यात आले. 

यावेळी पुणे जिल्हा संघटक नीरजभाऊ कडू ,युवा उद्योग विशाल कांबळे यांच्या उपस्थितीत देण्यात आले.

To Top