नवसह्याद्री शिक्षण संस्थेमध्ये अभियांत्रिकी महाविद्यालयाने जोडली नवनवीन तंत्रज्ञानाची नाळ - प्राचार्य डॉ आर. जे. पाटील.
नसरापूर (प्रतिनिधी):-
औद्योगिक क्षेत्रात येणारे नवनवीन तंत्रज्ञान व विद्यापीठाने दिलेला अभ्यासक्रम यांची सांगड घालतांना येणाऱ्या आव्हानांना कसे सामोरे जात येईल आणि गुणवत्ता कशी वाढविता येईल या बद्दलचे विविध कार्यक्रम राबवून महाविद्यालयाचे प्राचार्य श्री आर .जे . पाटील सर यांनी औद्योगिक क्षेत्रातील विविध मान्यवरांशी चर्चा करून येणाऱ्या काळात लागणारी नवीन तंत्रज्ञानाची जोड निर्माण केली.
नवसह्याद्री शिक्षण संस्थेमध्ये अभियांत्रिकी महाविद्यालयात , अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद , नवी दिल्ली यांनी या वर्षाच्या सत्रात २०२१-२२ मध्ये विद्यार्थ्यांसाठी आर्टीफिसिअल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग या अभ्यासक्रमाला मान्यता दिली. या शाखेने औद्योगिक व वैद्यकीय क्षेत्रात कमालीचा बदलाव होणार आहे.
आर्टीफिसिअल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग ही संगणक विज्ञानांची एक शाखा आहे जी इंटेलिजेंस मशीनच्या विकासावर, मनुष्यांप्रमाणे विचार करणे आणि कार्य करण्यावर जोर देते. उदाहरणार्थ, भाषण ओळख, समस्या सोडवणे, शिकणे आणि नियोजन.
आज, कृत्रिम बुद्धिमत्ता हा एक अतिशय लोकप्रिय विषय आहे ज्याची तंत्रज्ञान आणि व्यवसाय मंडळांमध्ये मोठ्या प्रमाणात चर्चा केली जाते. बरेच तज्ञ आणि उद्योग विश्लेषक असा तर्क करतात की एआय किंवा मशीन शिक्षण हे भविष्य आहे - परंतु जर आपण सभोवताल पाहिले तर आपल्याला खात्री आहे की हे भविष्य नाही - हे सध्याचे आहे.तंत्रज्ञानाच्या प्रगतीसह आधीच एआयशी एक मार्ग किंवा इतर मार्गाने कनेक्ट झालो आहोत - मग तो सिरी, वॉटसन किंवा अलेक्सा असो. होय, तंत्रज्ञान त्याच्या सुरुवातीच्या टप्प्यात आहे आणि अधिकाधिक कंपन्या मशीन लर्निंगमध्ये संसाधनांची गुंतवणूक करीत आहेतसामान्य समज विपरीत, कृत्रिम बुद्धिमत्ता केवळ आयटी किंवा तंत्रज्ञान उद्योगपुरते मर्यादित नाही; त्याऐवजी वैद्यकीय, व्यवसाय, शिक्षण, कायदा आणि उत्पादन अशा इतर क्षेत्रात याचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात आहे.नवीन तंत्रज्ञान विद्यार्थ्यांना अवगत व्हावे आणि त्या
तंत्रध्यानाने येणाऱ्या आव्हानांना सामोरे जावे. जेणेकरून औद्योगिक विकास हा अटळ आहे असे प्रतिपादन संस्थेचे ग्रुप डायरेक्टर सागर सुके यांनी केले.
मुख्यतः ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना याचा फायदा मिळावा म्हणून हि नवीन महावियालयात आली आहे. या शाखेचा अभ्यासक्रम प्रत्येक क्षेत्रात विद्यार्थ्यांचे कौशल्य वाढविण्यासाठी मदत करण्यासाठी तयार केलेला आहे. आणि जास्त डेटाच्या स्पर्धा करण्यास तयार असलेल्या अभ्यासक्रमातून विद्यार्थी शिकून बाहेर पडतील असे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष पी. एन . सुके यांनी म्हटले आहे.
