नसरापूर येथे छत्रपती सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सुरू.

Maharashtra varta

 छत्रपती सुपर स्पेशालिटी हॉस्पिलमुळे नसरापूर आणि ग्रामीण भागात शहरी वैद्यकीय सेवा उपलब्ध झाली आहे - आमदार संग्राम थोपटे.


नसरापूर येथे छत्रपती सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सुरू.



नसरापूर (प्रतिनिधी):-

शहराची व्याप्ती विस्तारत आहे. त्यामूळे ग्रामीण भागाचाही चेहरा बदलत आहे. छत्रपती सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल म्हणजे या बदलांचे प्रतिक आहे. प्राथमिक स्तरावरील आरोग्य सेवा या भागात ऊपलब्ध होत्या, परंतू उत्तम दर्जाची अत्याधुनिक  चिकीत्सा सुविधा  ऊपलब्ध होणे गरजेचे होते. रोडलगत जर अपघात झाला, तर त्यावर उपचार मिळणेही महत्वाचे होते आणि त्यादृष्टीने छत्रपती सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल महत्त्वाची भुमिका बजावेल, असा विश्वास  मनापासुन वाटतो असे मत आमदार संग्राम थोपटे यांनी व्यक्त  केले.

नसरापूर ता. भोर येथे "छत्रपती सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल" च्या उद्घाटन प्रसंगी आमदार थोपटे बोलत होते.

याप्रसंगी आमदार संग्राम थोपटे, राजगड सहकारी साखर कारखान्याचे संचालक के.डी. भाऊ सोनवणे, पोपटराव सुके,  मारुतराव गुजर ,वेल्हे तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष बापूसाहेब शेंडकर, वेल्हे तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मा. अध्यक्ष किरण  राऊत, प्रसिद्ध उद्योजक माऊली लोहकरे, वेल्हे तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे मा. अध्यक्ष तानाजी बापू मांगडे, पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष प्रदीप मरळ,  चिंतामणी हॉस्पिटलचे सचिन यादव,डॉ .शिवाजी चव्हाण, सरपंच रोहिणी शेटे आदी मान्यवर उपस्थित होते.

छत्रपती सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल चे संचालक डॉ. संभाजी मांगडे न्यूज वार्ताशी बोलताना म्हणाले की,मागील वीस वर्षांपासून मी वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत आहे. व्यावसायिक यशाची गोडी मी चाखली आहे. त्या अर्थाने पुणे ही माझी कर्मभूमी आहे ,परंतु ज्या मातीत मी जन्मलो, लहानाचा मोठा झालो त्या जन्मभूमीत सेवा देण्याची माझी प्रमाणिक इच्छा होती. ग्रामीण भागातील लोकांना देखिल शहराप्रमाणे सुविधा आणि ती ही माफक खर्चात मिळायला हवी या प्रमाणिक जाणीवेतून मी आणि सहकारी डॉ.बालाजी कल्याणे मिळून हे हॉस्पिटल याठिकाणी उभारले आहे.

भोर ,वेल्हा नसरापुर आणि पंचक्रोशीतील लोकांना उत्तम प्रतीची वैद्यकीय सेवा देण्याचा आमचा मानस आहे.असे मत छत्रपती सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल चे संचालक डॉ. संभाजी मांगडे मांडले.

To Top