मंगेशराव ढमाळ यांची पुणे जिल्हा प्रहार जनशक्ती पक्ष उपाध्यक्ष पदी निवड.

Maharashtra varta

 मंगेश राव ढमाळ यांची पुणे जिल्हा  प्रहार जनशक्ती पक्ष उपाध्यक्ष पदी निवड.


पुणे (प्रतिनिधी):-

 मंगेशराव ढमाळ (नीरा-ता. पुरंदर) यांची पुणे जिल्हा  प्रहार जनशक्ती पक्षाच्या उपाध्यक्षपदी तथा  प्रहार बारामती लोकसभा प्रतिनिधीपदी लोकनेते, प्रहार चे राष्ट्रीय अध्यक्ष, राज्यमंत्री,  बच्चू भाऊ कडू  यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे जिल्हा संपर्क प्रमुख, राज्य प्रवक्ते  अजयजी महाराज बारस्कर  यांच्या  आदेशाने जिल्हाध्यक्ष अनंतराव काळे यांनी नियूक्ती पत्र देवून मंगेश राव ढमाळ यांची नव्याने नियूक्ती केली.

  मंगेश ढमाळ हे प्रहारचे पुणे जिल्ह्यातील  प्रथम कार्यकर्त्यांच्या फळीतील सच्चा प्रहार कार्यकर्ता असून प्रहारचे माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम राबवले आहेत. अनेक दिव्यांगांना व रुग्णांना मदत व सहकार्य करत आहे. प्रसिद्धीपासून ते दूर असून सामाजिक कार्य करत राहणे हा त्यांचा स्थायीभाव आहे.         

 सदर निवडीमुळे निष्ठावान कार्यकर्ते यांना न्याय देण्यात आल्याची भावना सर्व प्रहार सेवकांमध्ये व कार्यकर्त्यांमध्ये  निर्माण झाली. सामाजिक व राजकीय कारकिर्दीस  मंगेश ढमाळ यांना पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शुभेच्छा दिल्या.           

 यावेळी  प्रहारचे पुणे जिल्हा अध्यक्ष अनंतराव काळे,अजय महाराज बारस्कर, राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांचे स्वीय सहायक गौरव दादा जाधव इतर प्रहार सेवक उपस्थित होते.

( उपाध्यक्ष निवडी बद्दल मंगेश राव ढमाळ  म्हणाले की,राज्यमंत्री व आमचे दैवत बच्चूभाऊ कडू यांच्या कुशल नेतृत्वाखाली व सहकारी यांच्या मदतीने  पुणे जिल्ह्यात प्रभावी व लोकाभिमुख काम करणार आहे.)

To Top