नवसह्याद्री इन्स्टिटयूट ऑफ फार्मसी मध्ये ट्रेनिंग, प्लेसमेंट व बायो - आक्सीलेरेटर सेल चे उदघाटन व सुशिमा फार्मास्युटिकल कंपनीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ
नसरापूर (प्रतिनिधी)
नवसह्याद्री एजुकेशन सोसायटी द्वारा संचालित नवसह्याद्री इन्स्टिटयूट ऑफ फार्मसी महाविद्यालयामध्ये ट्रेनिंग प्लेसमेंट व बायो - आक्सीलेरेटर सेल चे उदघाटन समारंभ तसेच सुशिमा फार्मास्युटिकल निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ पार पडला.
या वेळी कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष श्री. पोपटराव सुके व संचालक श्री. सागर सुके उपस्थित होते.तसेच विशेष अतिथी म्हणून डॉ.के.एस. चरक (संचालक ,व्यवस्थापन महाविद्यालय), डॉ.आर.जे .पाटील (प्राचार्य ,अभियांत्रिकीय महाविद्यालय), श्री पंकज भोकरे ( प्राचार्य ,तंत्रज्ञान महाविद्यालय) इत्यादी उपस्तिथ होते. या कार्यक्रम सुरवातीस प्रमुख अतिथी व संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष श्री. पोपटराव सुके यांनी स्वागतफीत कापून केली त्यानंतर प्रमुख अतिथी व इतर सर्व सन्माननीय अतिथींनी सरस्वती पूजन व दीपप्रज्वल केले.प्राचार्य डॉ. किशोर ओतारी यांनी कार्यक्रमाची रूपरेषा स्पष्ट करत संबंधित विभागांची आवश्यकता स्पष्ट करत संशोधन क्षेत्रातील होणारे नवीन संशोधन त्यामुळे कार्यक्षमतेचा मिळणारी चालना व त्याचे व्यावसायिक फायदे तसेच नोकरीच्या संधी विद्यार्थ्यांन पर्यंत पोहोचवून त्यांना योग्य मार्गदर्शन मिळणे व त्यांच्यातील कौशल्य विकासाची भूमिका याबद्दल माहिती दिली. नंतर महाविद्यालयाचे बायो - आक्सीलेरेटर विभागाचे प्रभारी प्रा.डॉ. प्रवीण बधे यांनी बायो - आक्सीलेरेटर विभाग आणि त्याची आवश्यकता व त्याची कार्यप्रणाली यांची ओळख करून दिली. सोबतच महाविद्यालयातील ट्रेनिंग व प्लेसमेंट विभागाचे प्रभारी प्रा. ओमकार कोल्हे यांनी ट्रेनिंग व प्लेसमेंट विभागाची रचना, कार्यपद्धती व आगामी नियोजनाची माहिती दिली. यानंतर सुशिमा फार्मास्युटिकल कंपनीत निवड झालेल्या ओंकार किसान दळवी ,पियुष हनुमंत हिंगे, संकेत संदेश पिसाळ , संकेत भीमराव शेळके , भ्रूज पटेल या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा सत्कार संस्थेचे सन्माननीय संचालक श्री. सागर सुके साहेब यांचा हस्ते झाला. कार्यक्रमाचे नियोजन व व्यवस्था प्रा. गणेश फडतरे यांनी केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर ओतारी तसेच संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष श्री. पोपटराव सुके, संचालक श्री. सागर सुके तसेच अन्य पदाधिकारी यांनी विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

