वेल्हा तहसील कार्यालयातील कर्मचारी व अधिकारी तलाठी व सर्कल यांची सखोल चौकशी करून तात्काळ कारवाई करा:-भोर तालुका प्रहार जनशक्ती पक्षाची मागणी.

Maharashtra varta

 वेल्हा तहसील कार्यालयातील कर्मचारी व अधिकारी तलाठी व सर्कल यांची सखोल चौकशी करून तात्काळ कारवाई करा:-भोर तालुका प्रहार जनशक्ती पक्षाची मागणी.


पुणे (प्रतिनिधी):-

आडवली ता. वेल्हा जि. पुणे येथील गट नंबर 276 दस्त नंबर 598 / 2017 या नोंदीबाबत वेल्हा तहसील कार्यालय व संबंधित तलाठी व सर्कल  आणि अधिकारी यांनी  केलेल्या गैरव्यवहाराची  तात्काळ चौकशी होऊन कारवाई होणेबाबतचे निवेदन प्रहार जनशक्ती पक्ष, भोर यांच्या वतीने विभागीय आयुक्त पुणे यांना दिले आहे.

 या दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की , अडवली ता. वेल्हे येथील जमीन गट नंबर 276 चे मालक खातेदार सुरेश धोंडिबा शिंदे याचे क्षेत्र 0 हे 50 आर इतके होते. त्याने सदर क्षेत्र दि. 1/7/ 2017 रोजी आशु खुराना  व बळीराम शिंदे यांना रजिस्टर खरेदीखत करून दिले होते .

या दस्ताचे दुय्यम निबंधक वेल्हा  यांनी युक्त दिनांकासच ई प्रणालीद्वारे ऑनलाइन म्युटेशन करून त्याबाबतचा दस्त  त्यास दिनांक ई-फेरफार प्रणालीस तहसीलदार  वेल्हा यांना पाठवला होता.

तरी दुय्यम निबंधक वेल्हा यांनी सदर दस्ताचे अ पत्रक दि. 29/ 6/ 17 रोजी तहसील कार्यालय वेल्हे यांना पाठवले होते. या वेळेस तहसील कार्यालय वेल्हे यांनी आवक-जावक लिपिक यांनी सदर अ पत्रकाचे पोच मिळाली असे पोच दिली .

तरी या दस्ताचे ई फेरफार अ  पत्रकाच्या आधारे फेरफार 7/12 सदरी तलाठी व सर्कल यांनी  जाणीवपूर्वक घेतले नाही.

 याबाबतचे अ पत्रक महसूल वेल्हा अधिकारी, कर्मचारी आणि विशेषत तलाठी व  सर्कल यांनी सदर दस्ताचे अ पत्रक गायब करून सदर फेरफार मंजूर न करता आपल्या अधिकाराचा गैरवापर करून सरकारी दस्तऐवज गायब करून जनतेची व शासनाची मोठी फसवणूक केली असल्याचे निदर्शनास येत आहे.

 याबाबतची  माहिती घेतली असता तहसील कार्यालय वेल्हे व तलाठी आडवली यांनी या नोंदणीकृत दस्तचे कोणतेही अ पत्रक ,ऑनलाईन नोंदी इ फेरफार  कागदपत्र आमच्याकडे आलेली नाही, असे नमूद केलेले आहे. तरी याबाबत तलाठी आडवली सजा मार्गासनी यांनी दि. 16 /7/ 21 रोजी च्या दिलेल्या लेखी उत्तरात असे म्हटले आहे की, या दस्ताचे ई फेरफार व अ पत्रकाचे अवलोकन करता ही बाब निदर्शनास येत नाही. असे नमूद करून दस्त नंबर 598 /2017 फेरफार नोंदीबाबत महसूल मधील अधिकारी कर्मचारी तलाठी व सर्कल यांनी परस्पर संगनमताने या दस्ताचे  हक्क नोंद वही व नोंदीबाबत  मोठा गैरव्यवहार जाणीपूर्वक केल्याचे दिसून येते.

 598 /2017 या दस्ताचे अपत्रक ई फेरफार मंजूर न करता शासकीय दस्तऐवज महसूल मधील संबंधित अधिकारी व कर्मचारी यांनी एकमेकांच्या संगनमताने गायब करून खातेदार सुरेश शिंदे यांच्याकडून आर्थिक मलिदा लाटल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. याबाबतची चौकशी व कारवाई होणे आवश्यक आहे.

सुरेश शिंदे याने पहिले करून दिलेले खरेदीखत नोंद न झाल्याने  सुरेश शिंदे याने हीच जमीन पुन्हा जाणीवपूर्वक सरिता बजरंग वालगुडे यांना खरेदी  दस्तने 22/2/2019 रोजी पुन्हा  विकली. दुबार खरेदी खत करणारा सुरेश शिंदेस मदत करणारे  वेल्हा तहसील कार्यालयातील कर्मचारी व अधिकारी तलाठी व सर्कल यांची सखोल चौकशी करून तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी भोर तालुका प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष संतोष मोहिते यांनी केले आहे.यावेळेस भोर तालुका प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष संतोष मोहिते,चिटणीस विशाल बाठे ,कोषाध्यक्ष मंगेश शिंदे व सदस्य सोपान बाठे उपस्थित होते.

सुरेश शिंदे या इसमाने अडवली येथील गट नं.276 या जमिनीचे दुबार दस्त केले आहे.त्याच्यावर कारवाई करावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.  वेल्हा पोलीस  या कामी नेमकी कोणती कारवाई करणार ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

To Top