भोर तालुका प्रहारच्या वतीने राज्यमंत्री बच्चू भाऊ कडू यांचा वाढदिवस उत्साहातसंपन्न.

Maharashtra varta

 भोर तालुका प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने राज्यमंत्री  बच्चू भाऊ कडू यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी संपन्न.




सारोळा( प्रतिनिधी):-टी. यादव पाटील.

बच्चुभाऊं च्या रूपाने महाराष्ट्र राज्याला उमदे, निस्वार्थी नेतृत्व लाभले आहे .आता शेतकरी हक्काची लढाई लढायला तयार झाले आहेत .राज्यभरातील तरुणाईचा त्यांना पाठिंबा आहे. प्रतिकूल परिस्थितीत कुठल्याही प्रश्नाचे तड लावण्याची बच्चुभाऊ यांच्याकडे प्रचंड ताकद आहे. खऱ्या अर्थाने "इडा पिडा टळो, बळीचे राज्य येण्यासाठी शेतकरी कट्टर वादाचे लढाई लढायला बच्चुभाऊ ठाकले आहेत, ते शेतकऱ्यांच्या सन्मानासाठी असे गौरवोद्गार भोर तालुका बळीराजा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष श्यामसुंदर जायगुडे यांनी काढले.


 भोंगवली ता. भोर येथे राज्यमंत्री  बच्चू भाऊ कडू यांचा वाढदिवस संपन्न झाला, त्या कार्यक्रमाप्रसंगी जायगुडे बोलत होते.

महाराष्ट्र राज्याचे प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष व राज्य मंत्री नामदार बच्चुभाऊ कडू यांचा वाढदिवस भोर तालुका प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष संतोष मोहिते व प्रहारचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या माध्यमातून विविध  सामाजिक उपक्रमाने संपन्न झाला. 


या वाढदिवसाच्या निमित्ताने चेलाडी (नसरापूर)येथील आदिवासी महिला भगिनींना साडी वाटप तसेच ड्रायफूड चे वाटप करण्यात आले, तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र भोंगवली च्या प्रांगणात वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न झाला तसेच भोंगवली तालुका भोर येथे प्रहार जनशक्ती पक्षाची पहिली शाखा स्थापन करण्यात आली . भोंगवली गावची प्रहार जनशक्ती पक्षाची शाखा कार्यकारिणी नेमण्यात आली व त्यांचा सन्मान  मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला .भोंगवली येथील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य तसेच ड्रायफूट, सॅनिटायझर वाटप करण्यात आले. ज्येष्ठ नागरिकांसाठी ड्राय फुडचे वाटप केले. गावातील माजी सैनिकांचा या कार्यक्रमाच्या प्रसंगी सन्मान करण्यात आला.


 यावेळी दिवळे गावातील तरुणांचा प्रहार जनशक्ती पक्षांमध्ये प्रवेश कार्यक्रम घेण्यात आला ,या कार्यक्रमासाठी भोंगवली गावचे सरपंच अरुण पवार, , भोर तालुका  बळीराजा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष श्याम सुंदर जायगुडे, भोर तालुका ग्राहक फाऊंडेशनचे अध्यक्ष सागर दादा खुटवड ,प्रहार जनशक्ती पक्षाचे उपाध्यक्ष तुषार कोंडे, सचिव सचिन गावडे कार्याध्यक्ष सुरेश बागल, सरचिटणीस अजय गोरड, भोर तालुका प्रहार जनशक्ती पक्षाचे चिटणीस विशाल बाठे, सामाजिक कार्यकर्ते  राम पाचकाळे,समीर आवाळे,सोपान बाठे, रामचंद्र पांगारे ,रोहित पांगारे प्रहार सेवक लक्ष्मण गायकवाड, जगन्नाथ तनपुरे ,प्रसाद कोंडे,बाळासाहेब शेडगे, देवेंद्रजी निगडे ,कालिदास भिलारे, विजय चव्हाण ,तुकाराम पोळ, हेमंत ताठे यावेळेस  उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन प्रसिद्ध निवेदक विठ्ठल पवार यांनी केले तर उपस्थितांचे स्वागत भोर तालुका प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष संतोष मोहिते यांनी केले आणि आभार चेतन गायकवाड यांनी मानले.

To Top