बच्चुभाऊ कडू यांच्या वाढदिवसा निमित्त सातारा जिल्ह्यात विविध कार्यक्रम संपन्न.
सातारा (प्रतिनिधी):-
बच्चुभाऊंच्या रूपाने महाराष्ट्र राज्याला उमदे, निस्वार्थी नेतृत्व लाभले आहे . कोणतेही पक्षीय वलय वा राजकीय पार्श्वभूमी नसतानाही प्रचंड आत्मविश्वास अन कार्यकर्त्यांच्या भक्कम पाठबळावर लोकहितासाठी विधानसभा हादरून सोडणारे पहिले आमदार बच्चूभाऊ कडू आहेत. राज्यभरातील तरुणाईचा त्यांना पाठिंबा आहे. प्रतिकूल परिस्थितीत कुठल्याही सामाजिक प्रश्नाची तड लावण्याची बच्चुभाऊ यांच्याकडे प्रचंड ताकद आहे. आजवरची बच्चूभाऊ यांची कारकीर्द जशी वादळी ठरली,तितकीच ती जनहिताला प्राधान्य देणारी ठरली असे प्रतिपादन राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांचे स्वीय सहाय्यक गौरवदादा जाधव यांनी काढले.
नामदार बच्चु कडू यांच्या वाढदिवसा निमित्त सातारा जिल्ह्यात ठिकठिकाणी तालुक्यांत रक्तदान शिबिरे,,वृक्षारोपण,रुग्णांना फळे वाटप,बेघरांना ताडपत्री वाटप,विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप,लसीकरण व गुणवंतांना बच्चु कडू गौरव पुरस्कार आदी कार्यक्रम घेण्यात आले.त्यावेळेस गौरवदादा जाधव बोलत होते.
गोखली ता.फलटण जि.सातारा येथे प्रहार जनशक्ती पक्षातर्फे तालुका अध्यक्ष सागर गावडे यांनी सामाजिक दायित्वच्या भूमिकेतून रक्तदान व लसीकरण शिबिर आयोजित केले होते. त्यामध्ये 150 पेक्षा अधिक नागरिकांनी रक्तदान केले .सोबतच अपंग बांधवांना लसीकरण करण्यात आले.
वयाच्या 6 व्यावर्षी 143 किमी सायकलिंग रेकॉर्ड 1 मिनटात 100 पूशअप ,50 प्रकारच्या दोरी उड्या इत्यादी स्थापित करणाऱ्या "स्वरा भागवत" हिला क्रिडा प्राविण्यासाठी बच्चू कडू गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. सोबत डॉक्टर नर्सेस ,यांना देखील सामाजिक कामासाठी पुरस्कार देण्यात आला .
प्रहार तर्फे घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिर व लसीकरण याकरिता नागरिकांच्या मनात अतिशय सकारात्मक भावना चर्चा सुरू आहे.या संपन्न कार्यक्रमास शंभूराजे खलाटे (प्रहार संपर्कप्रमुख सोलापूर सातारा), गटाचे जिल्हा परिषद सदस्य सोबतच शिवसेना फलटण तालुकाध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते व प्रहारचे सातारा जिल्ह्यातील प्रहारसेवक उपस्थित होते.

