दुबार दस्त करणाऱ्यावर कायदेशीर कारवाई करा:-
भोर तालुका प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष संतोष मोहिते यांची मागणी.
पुणे (प्रतिनिधी)
वेल्हे तालुक्यातील अडवली येथील दुबार दस्त करणाऱ्यावर कायदेशीर कारवाई व्हावी, अश्या आशयाचे पत्र भोर तालुका प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष संतोष मोहिते यांनी वेल्हा पोलीस स्टेशनकडे दिले आहे.
पोलीस स्टेशन वेल्हा व तहसीलदार वेल्हा यांच्याकडे मोहिते यांनी दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, सुरेश धोंडीबा शिंदे हा माणूस जमीन खरेदी-विक्रीचे व्यवहार करतो व हा माणूस लोकांना फसवण्याचे काम करतो असे निदर्शनास आले आहे. वेल्हा तालुक्यातील आडवली येथील गट नंबर 276 या मिळकतीचे सुरेश शिंदे याने दुबार दस्त केले आहेत, या कामी शिंदे याने तलाठी व सर्कल यांना हाताशी धरून संगणमत करून पहिल्या खरेदीखताची नोंद होऊ दिली नाही व याच नमूद मिळकतीचा गट नंबर मधील पुन्हा हेच क्षेत्र दुबार खरेदीखताने विकलेले आहे. पूर्वी सुरेश शिंदे यांनी ही जमीन विकलेली असल्याचे माहीत असूनही पुन्हा खरेदीखत केले आहे. सुरेश शिंदे हा लोकांना फसवत आहे, त्यास तलाठी व सर्कल अधिकारी आंबवणे हे मदत करीत आहे ,त्यामुळे सुरेश शिंदे याची व तलाठी व सर्कल आंबवणे यांची सखोल चौकशी करून योग्य ती कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी भोर तालुका प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष संतोष मोहिते यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
या प्रसंगी प्रहार शेतकरी संघटनेचे अध्यक्ष भरत रांजणे व प्रहार सेवक मंगेश गायकवाड, राजु बोडके व नितिन आधवडे उपस्थित होते.

