गणेशकुंज सोसायटी शिरवळ मधील सदनिकाधारक संतोष मोहिते यांनी केला, आत्मदहनाचा प्रयत्न.
सातारा ( प्रतिनिधी):-
गणेशकुंज सोसायटी शिरवळ मधील सदनिकाधारक संतोष मोहिते यांनी आज दि. 15 जुलै 2021 दुपारी सातारा जिल्हा धिकारी कार्यालयाच्या बाहेर अंगावर रॉकेल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला.सातारा पोलिसांनी त्यांना वेळीच रोखलं,नाहीतर मोठा अनर्थ घडला असता असे सूत्रांनी न्यूज वार्ताशी बोलताना सांगितले.
गणेश कुंज सोसायटीचे बिल्डर गायकवाड व राठी यांनी वेळोवेळी सुधारित मंजूर बांधकाम आराखड्यामध्ये शासनाची व सदनिकाधारकांची वेळोवेळी फसवणूक केली आहे. याबाबत सदनिकाधारकांनी शासनाकडे वेळोवेळी तक्रारी निवेदने वस्तुनिष्ठ देऊनही त्या बिल्डरवर कारवाई होत नाही. व पर्यायाने सदनिकाधारकांना न्याय मिळत नसल्याने शेवटचा पर्याय म्हणून त्यांनी पुन्हा हे आजचे आत्मदहन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर केले असल्याचे मोहिते यांनी सांगितले.
या घटनेनंतर सातारा शहर पोलिसांनी संतोष मोहिते यांना ताब्यात घेतले.

