गणेशकुंज सोसायटी शिरवळ मधील सदनिकाधारक संतोष मोहिते 15 जुलैला करणार, आत्मदहन.
सातारा ( प्रतिनिधी):-
गणेशकुंज सोसायटी शिरवळ मधील सदनिकाधारक संतोष मोहिते आत्मदहन करणार असल्याचे निवेदन दि.24 जून 2021 रोजी सातारा जिल्हाधिकारी कार्यालयास दिले आहे.
मौजे शिरवळ ता. खंडाळा,येथील गट नं 1319/1मंजूर रेखांकन प्रमाणे सुधारित इमारत बांधकाम आराखड्यास मंजुरी मिळणेबाबत प्रकरणात तत्कालीन लिपिक जिल्हाधिकारी कार्यालय सातारा यांच्या विरुद्ध विभागीय चौकशी कारवाई दिनांक 12/ 6/ 19 रोजी सुरू करण्यात आली होती. विभागीय चौकशीची सुनावणीची कारवाई संपलेली असून विभागीय चौकशी ही अंतिम निर्णय घेण्यात प्रलंबित आहे असे जिल्हाधिकारी कार्यालय सातारा यांनी संतोष मोहिते यांना कळवले होते. त्याबाबत अंतिम निर्णय होत नाही व दोषी अधिकारी कर्मचारी यांच्यावर कारवाई होत नाही म्हणून ते स्वतःच्या कुटुंबासह संतोष मोहिते जिल्हाधिकारी कार्यालय किंवा शिरवळ येथील राहत्या घरी आत्मदहन करणार आहेत.
पर्यायाने सदनिकाधारकांना न्याय मिळत नसल्याने दि.15 जुलै 2021 रोजी आत्मदहन जिल्हाधिकारी कार्यालय,सातारा अथवा स्वतःच्या राहत्या घरी कुटूंबासह (शिरवळ) येथे करणार आहे माहिती संतोष मोहिते यांनी दिली आहे.व त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय, सातारा येथे दिलेल्या ( दि.24 जून 2021) रोजी निवेदनात म्हटले आहे.

