अनंतराव काळे यांची पुणे जिल्हा प्रहार जनशक्ती पक्ष अध्यक्षपदी निवड.
पुणे (प्रतिनिधी):-
अनंतराव काळे यांची पुणे जिल्हा प्रहार जनशक्तीअ ध्यक्ष पदी लोकनेते, प्रहार चे राष्ट्रीय अध्यक्ष, राज्यमंत्री, बच्चू भाऊ कडू यांच्या मार्गदर्शनाखाली व शुभ हस्ते निवड करण्यात आली.
या प्रसंगी पुणे जिल्हा संपर्क प्रमुख, राज्य प्रवक्ते अजयजी महाराज बारस्कर यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये नियूक्ती पत्रक देवून नियूक्ती झाली.
यावेळी बच्चू भाऊ कडू यांनी सर्व उपस्थित पदाधिकारी यांना मार्गदर्शन करुन शुभेच्छा व आशिर्वाद दिले.
यावेळी पुणे जिल्हा संघटक नीरजभाऊ कडू, पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष नंदकिशोर जगदाळे , हवेली तालुका प्रमुख महेश भाऊ कनकुरे, पुणे शहर अध्यक्ष सुनिल गोरे, पुणे शहर उपाध्यक्ष रोहित भोसले, पिंपरी चिंचवड शहर उपाध्यक्ष संदीप जाधव, व इतर प्रहार सेवक उपस्थित होते.
( अध्यक्ष निवडी बद्दल अनंतराव काळे म्हणाले की,राज्यमंत्री व आमचे दैवत बच्चूभाऊ कडू यांच्या कुशल नेतृत्वाखाली व सहकारी यांच्या मदतीने पुणे जिल्ह्यात प्रभावी व लोकाभिमुख काम करणार आहे.)

