भाजपा शीख समाज महाराष्ट्र राज्य सह प्रमुख पदी जसप्रीतसिंह परमजित सिंह सलुजा यांची निवड.
नसरापूर (प्रतिनिधी)
भारतीय जनता पक्ष अल्पसंख्यांक मोर्चा,तथा महाराष्ट्र राज्य शीख समाज सह प्रमुख पदी जस्प्रीत सिंह परमजित सिंह सलुजा यांची नुकतीच निवड करण्यात आली.
भारतीय जनता पक्षाचे अल्पसंख्यांक मोर्चाचे महाराष्ट्र राज्य शिख समाजाचे अध्यक्ष सुरेंद्रसिंह सूरी यांनी त्यांना नियुक्तीपत्र देऊन त्यांची निवड केली.महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजपाचे मा. अध्यक्ष व मा. आमदार जगदीश मुळीक व शहराध्यक्ष अनवर पठाण व सहकारी यांनी सलुजा यांच्या सुयोग्य निवडीबद्दल अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत.
(शीख समाजासाठी योगदान देऊन सामाजिक बांधिलकी जपणारे व्यक्तिमत्त्व म्हणून जस्प्रीत सिंह परमजित सिंह सलूजा यांचा गौरव करण्यात आला होता.)


