आदित्य बोरगे यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा.
वारकरी शिक्षण संस्था व माऊली अनाथ आश्रम येथे जीवनावश्यक वस्तूंचे वाटप.
तृप्ती पवार.
नसरापूर दि.31
पुणे जिल्हा युवासेना उपजिल्हा प्रमुख आदित्य प्रकाश बोरगे यांच्या वाढदिवसानिमित्त बनेश्वर वारकरी शिक्षण संस्था व माऊली अनाथ आश्रम येथे जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.
यावेळी बोलताना अनाथांची माय ह. भ. प. नवनाथ महाराज लिम्हन म्हणाले की, आजच्या या महामरीच्या काळात जिथं स्वतःची रक्ताची नाती साथ सोडत आहेत, तिथं आदित्य बोरगे सारखे कोरोना रुग्णांना मोफत डबे पोहचवत आहेत. आमच्या साठी आजच नाही तर कायम हाकेला धावून येणारा आदित्य आहे असे प्रतिपादन नवनाथ महाराज यांनी केले. त्यांनी चालू असलेल्या समाजकार्यासाठी व वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी आदित्य बोरगे यांच्या समवेत रोहिदास आबा कोंडे,प्रसिध्द निवेदक व पत्रकार विठ्ठल पवार सर,विनय आप्पा आढाव,सागर मरळ,आकाश कोंडे,राजू जाधव, मनोज कोंडे,जीवन बोरगे,अजित चंदनशिव,कुणाल भगत,सूरज भगत, ओमकार चोरघे, दत्ता भाऊ वाल्हेकर,बंटी वाल्हेकर,अक्षय बोरगे,माऊली कोंढाळकर, आदेश चंदनशिव,अजित तांबे,निलेश कोंडे,केतन यादव,कुणाल कांबळे, प्रतिक गायकवाड आदी उपस्थित होते.
(वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून तो खर्च सध्या कोरोना महामारीच्या काळात असलेली गरज ओळखून हे वस्तूंचे वाटप करण्यात आले. इतर तरुणांनी ही पुढे येऊन अश्या प्रकारे मदत करावी असे आवाहन यावेळी आदित्य बोरगे यांनी केले.)

