आदित्य बोरगे व रोटरी क्लबच्या माध्यमातून जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप.

Maharashtra varta

 दित्य  बोरगे व  रोटरी क्लबच्या माध्यमातून जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप.





नसरापूर (प्रतिनिधी)

 करंदी खे.बा. ता.भोर येथे आदित्य प्रकाश बोरगे यांच्या प्रयत्नातून व रोटरी क्लबच्या माध्यमातून जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे व रोग प्रतिकार शक्ती वाढीसाठी गोळ्यांचे वाटप करण्यात आले. गावातील लोकांची कोरोनामुळे होत असलेली अडचण ओळखून त्यासंदर्भात रोटरी क्लब कडे केलेल्या पाठपुराव्याला यश आले.यावेळी गावातील ५० लाभार्थीना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.या वेळी प्रकल्प अध्यक्ष रो. विनायक देशपांडे,रो. नितीन जाधव, रो. अविनाश इगवे,रो. जया शहा, सेक्रेटरी रो.डॉ. संपदा जोशी,रो. नरेंद्र शहा व रो. अभय जोशी यांची प्रमुख उपस्थिती व मार्गदर्शन लाभले.
      यावेळी आदित्य बोरगे,विजय कव्हे,शांताराम खाटपे,नितीन बोरगे,गणेश गोळे,नागेश बोरगे,अक्षय बोरगे,योगेश बोरगे,अजय बोरगे,तुषार बोरगे,तुकाराम बोरगे,अमोल गायकवाड,राजेंद्र गायकवाड, अजित बाबा चंदनशिव,शिवाजी माळवे,माऊली बोरगे व आदित्य बोरगे मित्रपरिवार हे उपस्थित होते.
    विजय आबा कव्हे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले व नितीन बोरगे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

To Top