कापूरहोळ-भोर फाट्यालगत विद्युत लाईन कोलमडलेली.
लाईन दुरूस्त करण्याची शेतकऱ्यांची मागणी.
नसरापूर: -
भोर फाटा त्यालगत कापूरहोळ गावच्या हद्दीतील किकवी महावितरणच्या कार्य क्षेत्रातील सारोळे-निगडे गावठाण फिडर चे विद्युत लाईनचे पोल एका बाजूला कललेले व कोलमडलेले असून पावसाळ्याच्या काळात येणारा वादळवारा व पावसाच्या माऱ्यामुळे संपूर्ण विद्युत लाईन कोसळण्याची शक्यता निर्माण झाली आहे या होणाऱ्या धोक्यामुळे जीवित व वित्त हानी ही संभवते. हा संभाव्य धोका टाळण्यासाठी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी, किकवी यांनी तातडीने या विद्युत लाईनचे पोल उभे करून दुरुस्ती करण्याची मागणी कापूरहोळ येथील शेतकऱ्यांनी केली आहे.
कापूरहोळ -भोर फाट्याच्या उजव्या बाजू कडील गेलेली विद्युत लाईन लगत शंभर एकराहून अधिक क्षेत्र लागवडीखालील आहे.याठिकाणी घरे ,शेतीव्यवसायचे पूरक उद्योग,व कंपन्यांचे वास्तव्य असल्याने येथे माणसांची वर्दळ सुरू असते.शेतकरी या ठिकाणी कायम शेतामध्ये या दिवसात काम करीत असतात. पावसाच्या माऱ्यामुळे व अचानक येणाऱ्या वाऱ्यांमुळे पोल केव्हाही कोसळू शकतात. त्यासाठी तातडीने येथील लाईन दुरुस्त करण्याची मागणी भोर तालुका शिवसेना नेते किशोर बारणे यांनी केली आहे.
किकवी महावितरण चे अधिकारी रत्नदिप करे म्हणाले की,त्या लाईनचा सर्वे करून लाईन दुरुस्ती केली जाईल.

