नसरापूर विद्युत पुरवठा विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व भागात झाडांची छाटणी करा-
युवासेना उपजिल्हा प्रमुख आदित्य बोरगे यांची मागणी.
नसरापूर (प्रतिनिधी)
दि .२८ रोजी युवासेना उपजिल्हा प्रमुख आदित्य बोरगे व सहकारी यांच्या वतीने मान्सून काळात विद्युत पुरवठा करणाऱ्या वीज वाहिन्या लगत वाढलेल्या वृक्षामुळे भविष्यात कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी नसरापूर विद्युत पुरवठा विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व भागात अशा झाडांची छाटणी करावी व करंदी खे.बा. येथील विद्युत वाहिनीवरील अतिरिक्त भाराचे समतोल वितरण व्हावे यासाठी महावितरणचे अधिकारी खडतरे साहेब यांना निवेदन देण्यात आले.
सदर झाडांची छाटणी न केल्यास भविष्यात झाडांमुळे विद्युत पुरवठा खंडित होणे, ओल्या झाडामध्ये विद्युत पुरवठा कार्यान्वित होणे, मोकळ्या तारांमुळे जनावरांना धोका निर्माण होणे अश्या गोष्टी घडू शकतात.त्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून झाडांची छाटणी करण्यात यावी अशी विनंती करण्यात आली.
यावेळी आदित्य बोरगे यांच्या समवेत विजय आबा कव्हे, तात्या खाटपे, अतुल कोंडे, पत्रकार विट्ठल पवार, अजित चंदनशिव,किरण बोरगे,तुकाराम बोरगे,सूरज भगत, ओमकार चोरघे व विभागातील ग्रामस्थ उपस्थित होते.
(महावितरणचे अधिकारी खडतरे म्हणाले की,सदर विद्यूत वाहिनी लगत असलेल्या झाडांची छाटणी सुरू करण्यात आली आहे, व करंदी खे बा येथील एका भागात विद्युत पुरवठा वारंवार खंडित होतोय ती देखील समस्या पुढील आठवड्या पर्यंत दूर होईल असे सांगितले.)

