प्रहार रुग्णसेवक अमोल बाप्पू मानकर यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा.
पुणे (प्रतिनिधी):-
राष्ट्रसेवा समूहाचे सदस्य, प्रहार रुग्णसेवक अमोल बाप्पू मानकर यांचा वाढदिवस अंध मुलींच्या संस्थेला धान्य व जीवनापयोगी वस्तू वाटप करून नुकताच साजरा करण्यात आला.
कोरोना महामारीमुळे संपुर्ण जग ठप्प झाले आहे. या महामारी मध्ये अनेक लोक दगावले तसेच अनेकांचे संसार उध्वस्त झाले आहेत. हवेली तालुक्यातील नऱ्हे गावामध्ये साई गुरू सेवा संस्था अंध मुलींचे वसतिगृह चालवते या संस्थेमध्ये 40 मुली राहतात. त्यांची गुजराण देणग्या व त्यांनी तयार केलेल्या ऑर्केस्ट्रा कार्यक्रमावर चालते पण लॉकडाऊन मुळे समारंभ बंद आहेत व देणग्या ही बंद झाल्या आहेत .,त्यामुळे यांना कोणतेही उत्पन्न नसल्यामुळे उपासमार व्हायला लागली होती ही बाब आमचे मित्र व साई सेवा संस्थेचे संजय पवळे यांच्या कडून समजल्यावर अमोलबाप्पू मानकर मित्र परिवाराने त्यांचा वाढदिवस या संस्थेमध्ये धान्य, भाजीपाला व इतर उपयोगी सामान देऊन करायचा ठरवले व सर्व मित्र परिवाराने आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो या भावनेने 1 महिना पुरेल एवढे सामान आज संस्थेला देऊन अमोल बाप्पू यांचा वाढदिवस आगळ्या-वेगळ्या पद्धतीने साजरा केला.
या वेळी राष्ट्रसेवा समूहाचे अध्यक्ष राहुलभाऊ पोकळे, साई सेवा संस्थेचे संजयभाऊ पवळे, राष्ट्रसेवा समूहाचे प्रवक्ते रणजीतभाऊ जोरे, डॅशिंग रुग्णसेवक नयनभाऊ पुजारी,रुग्णसेवक नितीन पगार,शुभम शहा, ओंकार येनपुरे,मनोज पायगुडे, बाबू ख़िरीड़, आकाश मोरे, पांडाभाऊ मोरे, विशाल मोरे,हर्ष गुंजाळ आदी उपस्थित होते.

