वृक्षारोपणासाठी किवतच्या युवकांचा सक्रिय पुढाकार.

Maharashtra varta

 वृक्षारोपणासाठी किवतच्या युवकांचा सक्रिय पुढाकार.



भोर (प्रतिनिधी):-पत्रकार  पवार

कोरोना महामारीच्या काळात ऑक्सिजन ची आवश्यकता खूप महत्वाची आहे. ऑक्सिजन वर आपले जीवन अवलंबून आहे,आज ऑक्सिजन आपण दवाखान्यात विकत घेत आहोत,मात्र ऑक्सिजन मोफत देण्याचे काम झाडे करतात,मात्र झाडे लावणे जगवणे महत्वाचे आहे, त्यासाठी आम्ही पुढाकार घेत आहोत असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते अजित बाबा चंदनशिव यांनी सांगितले.


बुधवार दि.२६ रोजी किवत ता. भोर येथे युवकांच्या माध्यमातून वृक्ष लागवडीची गरज ओळखून वृक्षारोपण करण्यात आले. आंबा, जांभूळ,गुलमोहोर, कडूलिंब अशी विविध प्रकारचे वृक्ष लागवड करण्यात आली. यावेळी दीपक बदक,उमेश चंदनशिव,शरद बोडके, अजित बाबा चंदनशिव,सुमित चंदनशिव,अक्षय चव्हाण,अतुल चंदनशिव,आदेश चंदनशिव,रोशन चंदनशिव,वसंत थोपटे,अजय चंदनशिव,अक्षय समगीर,अक्षय चंदनशिव,मंगेश आवाळे,गुलाब चंदनशिव, यशवंत चव्हाण, दशरथ चंदनशिव, प्रतिक बदक आणि ग्रामस्थ उपस्थित होते. पुढील काळात अश्याच प्रकारे युवकां च्या माध्यमातून अनेक संकल्पना राबणार असल्याचे अजित बाबा चंदनशिव यांनी सांगितले.

To Top