विजेच्या दुर्घटनेतील मृत मुलींच्या कुटुंबाना गटशिक्षणाधिकारी अश्विनी सोनवणे यांनी भेट देत राजीव गांधी विम्याचे प्रस्ताव तातडीने पाठविणार.
नसरापूर (प्रतिनिधी):-
भोर तालुक्यातील नसरापूर ( चेलाडी फाटा ) येथे वीज अंगावर वीज कोसळून कातकरी समाजातील दोन लहान मुली जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडली होती. या घटनेतील मयत झालेल्या मुलींच्या कुटुंबांना भोर पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी अश्विनी सोनवणे यांनी भेट देऊन त्यांचे सांत्वन करत राजीव गांधी विम्याचे प्रस्ताव तातडीने पाठवण्याची ग्वाही दिली.
रविवार (दि.2 ) रोजी सीमा अरुण हिलम वय ११, अनिता सिंकदर मोरे वय ९ दोघीही रा. नसरापूर चेलाडी फाटा ( ता. भोर ) या शाळकरी मुली वीज कोसळून मयत झाल्या . चांदणी प्रकाश जाधव वय ९ ही किरकोळ जखमी झाली. या पार्श्वभूमीवर गटशिक्षणाधिकारी सोनवणे यांनी भेट देऊन दुःखीतांचे अश्रू पुसत सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
याप्रसंगी विस्ताराधिकारी संजय रुईकर व ज.रा.सोनवणे व भोर तालुका शिक्षक संघटनेचे पदाधिकारी व नसरापूर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक उपस्थित होते.

