क्षेत्र माहुली सातारा परिसरात मोफत आरोग्यरथ ,आपल्या दारी"हा अभिनव उपक्रम सुरू.
सातारा (प्रतिनिधी):-
कोरोना महामारीवर "लवकर उपचार" हाच रामबाण उपाय त्याकरता त्वरित रुग्णांची रुग्णालयात ने आण करण्यासाठी "मोफत आरोग्यरथ ,आपल्या दारी"हा सामाजिक बांधिलकी चा उपक्रम जनहितार्थ सुरू करण्यात आल्याची माहिती राज्यमंत्री नामदार बच्चुभाऊ कडू यांचे स्वीय सहाय्यक आणि क्षेत्र माहुली विकास मंचाचे संस्थापक सदस्य गौरव दादा जाधव यांनी न्यूज वार्ताला दिली.
क्षेत्र माहुली, महागाव , सोनगाव ,बोरखळमधील सर्व नागरिकांसाठी मोफत सेवा सुरू करण्यात आली आहे.या गावातील नागरिकांनी या आरोग्य रथाचा लाभ घेतला असून तातडीने दवाखान्यात उपचार मिळत असून नागरिकांचे प्राण वाचले आहेत.सातारा जिल्ह्यात या उपक्रमाचे विशेष कौतुक होत असून नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
आरोग्य रथ आपल्या दारी या अभिनव या सामाजिक उपक्रमासाठी रुग्ण सेवक म्हणून प्रवीण डांगे, सौरभ जाधव, ऋषीकेश चव्हाण,शंभूराज शिंदे,गुरुराज रसाळ,तुषार बर्गे उत्कृष्ट काम करत आहे.
(क्षेत्र माहुली चे सुपुत्र व राज्यमंत्री ना. बच्चुभाऊ कडू यांचे स्वीय सहाय्यक आणि क्षेत्र माहुली विकास मंचाचे संस्थापक सदस्य गौरव दादा जाधव यांनी स्वतःची इनोव्हा गाडी आपत्कालीन आरोग्य रथ म्हणून नागरिकांच्या सेवेस उपलब्ध करून दिली आहे.महाराष्ट्र राज्यातील पहिलाच असा आदर्श उपक्रम राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांच्या मार्गदर्शनाखाली जाधव हे करत आहेत.)

