राजगड पोलीस स्टेशनकडून आशा वर्कर यांना आरोग्य किटचे वाटप.
किकवी( प्रतिनिधी):- पत्रकार √ पवार.
किकवी गावामध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत असताना राजगड पोलीस स्टेशन नसरापूर चे प्रभारी पोलीस निरीक्षक विलास देशपांडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी सामजिक जबाबदारी या नात्याने कोरोना काळात उत्कृष्ट काम करणाऱ्या आशा वर्कर यांना आरोग्यकिट देण्यात आले.त्याचा दैनंदिन वापर करावा. असे आवाहन केले.गावातील लोकांच्या अडीअडचणी समजावून घेतल्या.
ग्रामपंचायत किकवी यांच्या वतीने चालु असलेल्या उपाययोजनांची माहीती देण्यात आली.येत्या काळात ग्रामपंचायत किकवी व आरोग्य कर्मचारी गावामध्ये फिरुन प्रत्येक ग्रामस्थांची अऩ्टीजेन तपासणी करणार आहेत, त्यामुळे कोरोनाचा योग्य प्रतिबंध करता येईल, त्यासाठी नागरीकांनी सहकार्य करावे असे आवाहन पीएसआय राहुल साबळे यांनी केले.
यावेळेस सहाय्यक पोलीस निरीक्षक नवसारी व पोलीस कर्मचारी उपस्थित होते.

