दशरथ आबा धावले यांचे निधन.
नसरापूर ( प्रतिनिधी):-पत्रकार √ पवार.
तेलवडी ता. भोर येथील ज्येष्ठ सामाजिक व आध्यात्मिक कार्यकर्ते व उद्योजक,आणि दत्तभक्त दशरथ (आबा) अंतोबा धावले (वय 75) यांचे दि.27 एप्रिल 2021 रोजी अल्पशा आजाराने निधन झाले.
तेलवडी गावामध्ये 4 दशकाहून अधिक काळ दुग्ध उद्योग ,सामाजिक ,आध्यत्मिक, क्षेत्रात उत्कृष्ट काम त्यांनी केले. कात्रज दूध डेअरी कात्रज येथे 25 वर्षाहून अधिक काळ प्रामाणिक काम केले होते.
तेलवडी गावच्या सामाजिक व सांस्कृतिक कार्यात त्यांचा मोठा सहभाग होता.त्यांच्या अकस्मात निधनाने तेलवडी गावावर शोककळा पसरली आहे.
त्यांच्या मागे 2 मुले , विवाहित 2 मुली ,पत्नी ,नातवंडे असा परिवार आहे.
तेलवडी गावचे तंटामुक्ती समिती अध्यक्ष भरत धावले यांचे ते वडील होत.


