कामथडी गावचे किंगमेकर,सरपंच विजयदादा.
नसरापूर (प्रतिनिधी)
आज मंगळवार 11 मे 2021हा दिवस आमच्यासाठी आनंदाचा कारण असे की,कामथडी गावचे आमचे मित्र उद्योजक #विजय दादा मांढरे, यांचा आज #वाढदिवस त्यानिमित्ताने लेख...
भोर तालुक्यातील कामथडी गावचे भूषण प्रसिद्ध युवा उद्योजक.साधा,तितकाच निर्मळ, स्वच्छ वागणारे ,कामथडी गावचे किंगमेकर ,सरपंच
आमचे दादासाहेब....
लॅटिगेशनला सुट्टी देऊन मोकळं करणारा. ..रिअल इस्टेट चा बादशहा ...सात असावे 12 मित्रांची दिलदार ,सात बाऱ्याची श्रीमंती.उमदा व निर्भीड असलेला युवा उद्योजक म्हणून आदर्श निर्माण करणारे..मितभाषी, प्रेमळ, शारीरिक सौंदर्य उभे करणारे गोरेगोमटे बोलके डोळे ,पिळदार देहयष्टी असणारे आमचे "विजय दादा मांढरे".आम्ही हवा करत नाही आणि कुणाला करूही देत नाही असं सडेतोडपणे सांगणारे विजय दादा मांढरे..
परिस्थीतीवर आपण स्वार व्हायचं तिला आपल्यावर स्वार होऊ द्यायचं नाही. कितीही लाख संकटे आली तरी न घाबरता न डगमगता तोंड द्यायचं. परिस्थितीशी शरणागत न होता नवा इतिहास उभे करणारे .... माझा मित्र.... माझा युवा उद्योजक... विजय दादा मांढरे.
ह्या जन्मदिनाच्या शुभक्षणांनी
आपली सारी स्वप्नं साकार व्हावी
आजचा वाढदिवस आपल्यासाठी
एक अनमोल आठवण ठरावी...
आणि त्या आठवणीने
आपलं आयुष्य
अधिकाधिक सुंदर व्हावं...
हीच शुभेच्छा!
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
"भोर तालुक्यातील खेड़ेबारे मावळमधील प्रसिद्ध युवा उद्योजक, यशस्वी उद्योजक म्हणून लँडिंग व्यवसायातुन गरुडभरारारी घेऊन नावारूपाला येऊन आपल्या व्यक्तीमत्वाचा ठसा उमटविणारे विजय दादा मांढरे..
मेंढरासमोर उभे राहून धाक दाखवायला तर लांडग्यालाही जमत..
पण....लांडग्याच्या घोळक्यापुढे थांबून ड़रकाळी फोडायला काळीज अन रगत वाघाचच लागत...
दादासाहेब....
"श्रीमंतीत आदराने झुकायला
आणि गरिबीत खंबीरपणे उभं रहायला शिकविणारा आपला विचार खरोखरचं कौतुकास्पद आहे.. आपल्या सहवासातील व्यक्तींच्या सुखदुः खात कायम रहाणं ही मैत्रीची शिकवण तुमच्या दैनंदिन जीवनातुन आम्हाला पाहण्यास मिळते.विविध सामाजिक उपक्रमातील तुमचा निरपेक्ष व निस्वार्थ सहभाग सामाजीक बांधिलकी सांगतोय म्हणून माणूस मनापर्यंत पोहचला तरच नात निर्माण होत. नाहीतर ती फक्त ओळखच ठरते.. मोठं व्हायला ओळख नाही तर आपल्या माणसांची मन जपावी लागतात. हा तुमचा माणस जपण्याचा आदर्श आम्ही इतरांना सांगतो...अश्या आदर्श व्यक्तिमत्त्व असलेलं विजय दादा मांढरे.. तुमचं अवघं जीवन सुखमय, निरामय निरोगी आरोग्यदायी व्हावे.. समाजाची ,आई वडिलांची सेवा आपल्या हातून घडावी.आपलं जीवन हे समाजासाठी आदर्श ठराव ..त्यासाठी आपणास उदंड आयुष्य लाभावे.. अशी मनोकामना आई जगदंबेच्या चरणी करून आपणास अभिष्टचिंतनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा.. आणि शुभकामना....
_________________________

