हरिश्चंद्री आणि कापूरहोळमधील 125 ग्रामस्थांनी केले रक्तदान ..

Maharashtra varta

 हरिश्चंद्री आणि कापूरहोळमधील 125 ग्रामस्थांनी केले  रक्तदान .




कापूरहोळ ( प्रतिनिधी)

श्री. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या ऐतिहासिक भूमीतील पुरंदर किल्ल्यावर छत्रपती शंभुराजांचा जन्म झाला. त्या शंभुराजेंनी स्वराज्यासाठी आपले रक्त सांडवले व बलिदान दिले त्याच शंभु राजाला दूध पाजलेल्या पुरंदरच्या पायथ्याशी असलेल्या कापूरहोळ-हरिश्चंद्री गावातील आई वीर धाराऊ माता गाडे पाटील यांच्या भूमीतील पंचक्रोशीतील मावळ्यांनी कोरोना काळाचा प्रादुर्भाव पाहता आपल्या स्वराज्यावर ओढवलेल्या संकटातून बाहेर काढण्यासाठी मोठ्या प्रमाणावर रक्तदानाची आवश्यकता आहे.आपल्या रक्ताने कोणाच्या तरी चेहऱ्यावरचे हास्य फुलवू या. हा एक अनोखा सामाजिक संदेश देण्यात आला,असे प्रतिपादन भोर पंचायत समितीचे सदस्य रोहन बाठे यांनी केले.


वीर धाराऊ माता मित्र मंडळ कापूरहोळ ग्रामस्थ, जय हनुमान तरुण मंडळ हरिश्चंद्री, ग्रामस्थ यांच्याकडून रक्तदान शिबीर भरविण्यात आले होते. याप्रसंगी पंचायत समिती सदस्य रोहन बाठे बोलत होते .

या शिबिरात  125 रक्तदात्यांनी रक्तदान केले. यावेळी  भोरचे तहसीलदार अजित पाटील, गटविकास अधिकारी विशाल तनपुरे, मंडल अधिकारी मनीषा भूतकर, भोर तालुका आरोग्य अधिकारी  सूर्यकांत कराळे, सभापती दमयंती जाधव, कापूरहोळ ग्रामसेवक मदने, हरिश्चंद्री ग्रामसेवक राहुल शेलार, तलाठी भाऊसाहेब कापूरहोळ, प.स.सदस्य रोहनदादा बाठे किकवी पोलिस स्टेशनचे कर्मचारी, ग्रामपंचायत कापूरहोळचे उपसरपंच पंकज (बाबी) गाडे, ग्रामपंचायत हरिश्चंद्री सरपंच संध्या गाडे, सामाजिक कार्यकर्ते राम पाचकाळे, कुणाल गाडे, संदेश म्हस्के, संग्राम गाडे, राम गाडे, मारुती गाडे, अक्षय गाडे, विकास गाडे, अमीर बाठे, अक्षय सुदाम गाडे, अजय गाडे, निखिल गाढवे, शुभम गाडे, अक्षय गाडे, सोपान गाडे, संतोष गाडे, शुभम बंटी गाडे, विक्रांत पाचकाळे, अभिजित गाडे, किशोर गाडे आदी मान्यवर उपस्थित होते.

अक्षय रक्त केंद्र, हडपसर पुणे सहकार्य यांच्या सहकार्याने रक्तदानाचा सेटअप लावण्यात आला होता.

वीर धाराऊ माता मित्र मंडळ, कापूरहोळ ग्रामस्थ आणि जय हनुमान तरुण मंडळ हरिश्चंद्री ग्रामस्थ आयोजित  रक्तदान शिबिर भरविण्यात आले होते. या रक्तदान शिबिरात अनेक रक्तदात्यांनी हजेरी लावून आपल्या देशाला वाचवण्यासाठी रक्तदान करून खूप मोलाचे कार्य केले.


To Top