विजेच्या दुर्घटनेतील मृत मुलींच्या कुटुंबाना आदित्य बोरगे यांच्याकडून अन्नधान्य किट भेट.
नसरापूर (प्रतिनिधी):-
भोर तालुक्यातील नसरापूर ( चेलाडी फाटा ) येथे वीज अंगावर वीज कोसळून कातकरी समाजातील दोन लहान मुली जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडली होती. या घटनेतील मयत झालेल्या मुलींच्या कुटुंबांना पुणे जिल्हा युवा सेनेचे उपाध्यक्ष आदित्य बोरगे आणि मित्र परिवार यांनी भेट देऊन त्यांचे सांत्वन करत अन्नधान्याचे किट भेट देत त्या कुटुंबातील इतर मुलांचे शैक्षणिक पालकत्व स्वीकारणार असल्याचे सांगितले.
रविवार (दि.2 ) रोजी सीमा अरुण हिलम वय ११, अनिता सिंकदर मोरे वय ९ दोघीही रा. नसरापूर चेलाडी फाटा ( ता. भोर ) या शाळकरी मुली वीज कोसळून मयत झाल्या . चांदणी प्रकाश जाधव वय ९ ही किरकोळ जखमी झाली. या पार्श्वभूमीवर पुणे जिल्हा युवा सेनेचे उपाध्यक्ष आदित्य बोरगे आणि मित्र परिवार यांनी भेट देऊन दुःखीतांचे अश्रू पुसत सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
याप्रसंगी आदित्य बोरगे, विराज शिंदे, अजित बाबा चंदनशिव, कुणाल भगत,अनिल दगडे, सागर मरळ,सौरभ शेटे, निखिल भंडारी ,पत्रकार व निवेदक विठ्ठल पवार उपस्थित होते.

