करंदी खे.बा. येथे 8 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह.
नसरापूर (प्रतिनिधी):-पत्रकार पवार.
(न्यूज वार्ता ऑनलाईन)
करंदी खे. बा. (ता. भोर) येथील एकूण कोरोना पॉझिटिव्ह असलेल्यांची संख्या 8 झाली आहे. त्यामुळे करंदी खे. बा.गावातील नागरिकांनी कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे सर्वतोपरी पालन करून मास्क व सोशल डिस्टनस ठेवा ,गावातील प्रत्येक नागरिकांनी कोरोना प्रतिबंधात्मक नियमाचे तंतोतंत पालन करावे असे आवाहन नसरापूर प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी जयदीप कापसिकर यांनी न्यूज वार्ताशी बोलताना केले.
करंदी खे बा.“गावातील एकूण 8 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आल्या आहेत.त्यातील ऍक्टिव्ह पेंशट 6 आहेत.कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सर्वांनी खबरदारी घेणे गरजेचे आहे.
ग्रामपंचायत करंदी खे. बा. यांनी कोरोनाबाबत जनजागृती करून गावात निर्जंतुक फवारणी करून कोव्हीड प्रतिबंधात्मक सोयी सुविधा उपलब्ध करून देणे आता खूप गरजेचे झाले असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.ग्रामपंचायत यांनी गावात कडकडीत लॉक डाऊन बाबत निर्णय घेणे गरजेचे आहे.दररोज एक एक रुग्ण वाढत आहे.
ग्रामस्थांनी निष्काळजीपणे न वागता सोशल डिस्टन्सिंग, मास्क लावणे, सॅनिटाझर वापरणे, सार्वजनिक कार्यक्रम , अनावश्यक बाहेर न फिरणे ,गर्दी न करणे ,प्रत्येकाने काळजी घ्यावी .आपले कुटुंब आपली जबाबदारी या उक्ती चे पालन करून स्वतःची व कुटुंबाची काळजी घ्यावी.

