भोर तालुक्यात प्रहारच्या वतीने ताली-थाली बजाव आंदोलन.
भोर (प्रतिनिधी):- पत्रकार पवार
भारतात ४२ लाख टनाची आवश्यकता असुन ४५ लाख टन तुर उपलब्ध आहे. आवश्यकतेपेक्षा २ लाख टन तुर उपलब्ध असताना केंद्र सरकारने ६ लाख टन तुर आयात कशासाठी केली? तसेच तुर, मुग, उडीद आयात पुर्णपणे खुली करुन धान्याचे भाव पाडण्यात येणार. याकरीता प्रहारचे पक्षाचे संस्थापक अध्यक्ष बच्चूभाऊ कडू यांच्या नेतृत्वाखाली व प्रहारचे राज्य समन्वयक गौरवदादा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली भोर तालुक्यात प्रहार पक्षाच्या वतीने ताली-थाली बजाव आंदोलन केंद्र शासनाच्या तुर, मुग, उडीद या धान्याच्या आयात धोरणावर केलेले आहे,असे प्रतिपादन भोर तालुका प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष संतोष मोहिते यांनी केले.
भोर तहसील कार्यालयाच्या समोर शांततेच्या मार्गाने आंदोलन करण्यात आले. केंद्र सरकारने ६ लाख टन तुर आयात कशासाठी केली? या धोरणाचा निषेध करण्यात आला.ताली-थाली मोठ्याने वाजवून निषेध नोंदवण्यात आला.
या प्रसंगी प्रहार सचिव सचिन गावडे ,प्रहार कार्याध्यक्ष सुरेश बागल, प्रहार सरचिटणीस अजय गोरड, प्रहार सदस्य सोपान बाठे व सहकारी उपस्थित होते.

