राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त पुण्यात रक्तदान शिबीर संपन्न.

Maharashtra varta

 राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त पुण्यात रक्तदान शिबीर संपन्न.





पुणे (प्रतिनिधी):-

कोरोनानं जगभर अवघ्या मानवजातीला घेरलं आहे. कोरोना विषाणूचे महासंकट आपल्या देशावर आले आहे.आपल्या देशात आणि महाराष्ट्रात रूग्णाची संख्या सातत्यानं वाढत आहे. त्यामुळं रक्ताचा तुटवडा जाणवतो आहे.आरोग्यमंत्री राजेशजी टोपे ही गोष्ट सातत्यानं अधोरेखित करीत आहेत.कोरोनामुळे सर्वत्र भीतीचे व साशंक वातावरण आहे. सर्व व्यवस्थांवर विपरीत परिणाम झाला आहे. तसेच  ब्लड बँक मधील  रक्ताचा साठा कमी आहे.रक्ताची आवश्यकता असणारे रूग्ण मोठ्या प्रमाणात आहेतच.त्यांची गरज पूर्ण होण्यासाठी व कोणीही रूग्ण रक्त न मिळाल्याने दगावू नये.ह्यासाठी सामाजिक जबाबदारी म्हणून रक्तदान करा व देशसेवेत योगदान द्या असे आवाहन पुणे शहर काँग्रेसचे अध्यक्ष रमेश बागवे यांनी केले.


राजीव गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त  शास्त्रीनगर, कोथरूड येथे कोथरूड ब्लॉक काँग्रेस, जय जंगली महाराज प्रतिष्ठान, आस्तान- ए- कलंदर प्रतिष्ठान, राजीव गांधी पंचायत राज संघटना आणि विजय तरुण मित्र मंडळ ह्यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्या प्रसंगी मा. मंत्री बागवे बोलत होते.


या  शिबिराला पुणे शहर काँग्रेस अध्यक्ष रमेशदादा बागवे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सरचिटणीस अभय छाजेड, प्रदेश चिटणीस संजय बालगुडे, प्रदेश प्रवक्ते गोपाळ तिवारी, नगरसेविका वैशालीताई मराठे, असंघटित कामगार प्रदेश उपाध्यक्ष सुनील शिंदे, सुमित डांगी ह्यांनी भेट दिली.

ह्यावेळेस माजी नगरसेवक शिवा मंत्री, कोथरूड ब्लॉक अध्यक्ष विजय खळदकर,कोथरूड महिला अध्यक्षा मनिषताई करपे, संदीप मोकाटे, युवराज मदगे, बाबा खान, महेश विचारे, संजय मानकर, गणेश गोकुळे, दिनेश पेंढारे, जितेंद्र कोंढरे, निलेश वाघमारे, भगवान कडू, दिनेश सुतार,विश्वास खवळे,किरण मारणे, विजय मोहोळ,शारदा वीर, सुनीता शेलार, रंजना पवार, नीता पाटोळे इत्यादी उपस्थित होते. 

शिबिरात 75 पिशवी रक्त संकलित करण्यात आले. सर्व रक्तदात्याना गरम वाफेच मशीन भेट म्हणून देण्यात आले.

 या शिबिराचे आयोजन पुणे शहर काँग्रेस सरचिटणीस व असंघटित कामगार समन्वयक किशोर मारणे, शहर सरचिटणीस घनश्याम निम्हण, गफुर शेख, दत्ता गुंजाळ, विनोद मापारे ह्यांनी केले होते.

To Top