करंदी खे.बा. येथे आणखी 2 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह.

Maharashtra varta

 करंदी खे.बा. येथे आणखी 2 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह.





नसरापूर  (प्रतिनिधी):-तृप्ती पवार.


(न्यूज वार्ता ऑनलाईन)


 करंदी खे. बा. (ता. भोर) येथील एकूण कोरोना पॉझिटिव्ह असलेल्यांची संख्या 11 झाली आहे.कोरोना पोजिटिव्ह आलेला व्यक्ती गावात आज सकाळी फिरताना दिसली. त्यामुळे इतरांना त्यांचा ससंर्ग होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.


 त्यामुळे  करंदी खे. बा.गावातील नागरिकांनी   कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे सर्वतोपरी पालन करून मास्क व सोशल डिस्टनस ठेवा ,गावातील प्रत्येक नागरिकांनी कोरोना प्रतिबंधात्मक नियमाचे  पालन करावे .


  करंदी खे बा.“गावातील एकूण  व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आल्या आहेत.त्यातील ऍक्टिव्ह 10 पेंशट  आहेत.


कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सर्वांनी खबरदारी घेणे गरजेचे आहे.


 ग्रामपंचायत करंदी खे. बा. यांनी कोरोनाबाबत आणखी  जनजागृती करणे गरजेचे आहे. 



नागरिकांनी  निष्काळजीपणे न वागता सोशल डिस्टन्सिंग, मास्क लावणे, सॅनिटाझर वापरणे, एकमेकांच्या घरी न जाणे .आपले कुटुंब आपली जबाबदारी या उक्ती चे पालन करून स्वतःची व कुटुंबाची काळजी घ्यावी.

To Top