हृदयद्रावक! अवघ्या 21 दिवसांतच झाला खेळ; कुटुंबातील तिघांचे दुर्दैवी निधन.
नसरापूर (प्रतिनिधी):-पत्रकार पवार.
पहिल्या दु:खद घटनेतून सावरत नाही, तोच दुसरा निरोप येतो अन् या दोन्ही घटनांच्या भावनांना वाट मोकळी होण्यापूर्वीच तिसऱ्यांदाही तशीच बातमी येते. वेळ आली की, प्रत्येकाला जगाचा निरोप घ्यावाच लागतो पण, एकाच कुटुंबातील तिघांना आजारामुळे जीव सोडवा लागल्याची हृदयद्रावक घटना क्वचितच घडते.
करंदी खे.बा. ता. भोर येथील खाटपे कुटुंबातील थोरल्या मुलापाठोपाठ (संपत विनायक खाटपे-वय 62),आई (शांताबाई विनायक खाटपे.वय 80),व धाकट्या मुलाचे(दत्तात्रय विनायक खाटपे वय- 58)यांचे आज दि.18 मे रोजी निधन झाले.
तीन आठवड्यात एकापाठोपाठ एक घरातील मायेचा व कर्तृत्वाचा आधारवड हरपला.अवघ्या 21 दिवसांत अशा दु:खांचे धक्के खाटपे कुटुंबीय सोसतेय.
दूध व्यवसाय हा खरा प्रचंड परिश्रमाचा व्यवसाय .या व्यवसायाच्या माध्यमातून अहोरात्र कष्ट या कुटूंबाने करून प्रगती करून दाखवली. समाजाला कायम दिशा देण्याचे काम या कुटूंबाने केले. काळाचा दुर्दैवी घाला या संकटाने कुटुंबातील तिघांचे निधन झाले.या कुटूंबावर च नव्हे तर संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.
भोर तालुका काँग्रेस पक्षाचे सदस्य व करंदी ग्रामपंचायत सदस्य विठ्ठल खाटपे यांचे भाऊ व आई होत.

