रुग्णांना मोफत सल्ला व मार्गदर्शन करणाऱ्या डॉ.दर्शना परदेशी
नसरापूर (प्रतिनिधी):-पत्रकार पवार.
कोव्हीड रुग्णांना व इतर आजार असणाऱ्या रुग्णांना मोफत सल्ला व मार्गदर्शन करण्याचे प्रभावी काम केळवडे ता. भोर येथील डॉ.दर्शना परदेशी करत आहेत.
कोरोना या महाभयंकर वैश्विक आपत्तीमध्ये डॉक्टर, परिचारक आरोग्य विभागातील कर्मचारी, अधिकारी आपापल्या क्षमतेने प्रभावीपणे करताना दिसत आहे. सामाजिक स्वयंसेवी संस्था,तरुण मंडळे, प्रतिष्ठान, विविध क्षेत्रातले अधिकारी ,पदाधिकारी हे आपापल्या परीने योगदान देऊन समाजाची रात्रंदिवस सेवा करताना दिसत आहे. त्याचप्रमाणे गेली अनेक दिवस फोनवर गृह विलगीकरनात असलेल्या रुग्णांना मोफत सल्ला देऊन ,त्यांना बरे करणारे डॉक्टर म्हणजे केळवडे येथील दर्शना परदेशी ह्या आहेत.
सामाजिक सेवेची आवड असणाऱ्या दर्शना परदेशी यांनी वैद्यकीय क्षेत्र निवडले. गोरगरीब रुग्णाची त्यांना नाममात्र दरात सेवा द्यायची आहे, ही मनाशी खूणगाठ बांधत त्यांनी वैद्यकीय क्षेत्र निवडत आपले शिक्षण पूर्ण केले.
घरात आई वडील (सामाजिक कार्यकर्त्या असलेल्या आई कविता परदेशी व उद्योजक नंदकुमार परदेशी) यांच्याकडून त्यांना सेवेचे बाळकडू मिळाले आहे. त्यानुसार त्यांनी या कोरोना काळात फोनवर व सोशल मीडियावर महाराष्ट्र राज्यातील नागरिकांना मोफत ऑनलाईन सल्ला व मार्गदर्शन करत रुग्णसेवेचा त्यांनी विडा उचलला आहे. गृह विलगीकरणात असलेल्या कोव्हीड रुग्णास व नातेवाईक यांना त्यांनी मार्गदर्शन करत मानसिक आधार देत आहे.त्यांच्या या कार्याचे कौतुक अनेक नागरिकांनी व सामाजिक संघटनेने केलेले आहे.

