गणेशकुंज सोसायटी शिरवळ मधील सदनिकाधारक संतोष मोहिते पुन्हा करणार आत्मदहन.
सातारा ( प्रतिनिधी):-
गणेशकुंज सोसायटी शिरवळ मधील सदनिकाधारक संतोष मोहिते पुन्हा आत्मदहन करणार असल्याचे निवेदन सातारा जिल्हा धिकारी कार्यालयास नुकतंच दिले आहे.
गणेश कुंज सोसायटीचे बिल्डर गायकवाड व राठी यांनी वेळोवेळी सुधारित मंजूर बांधकाम आराखड्यामध्ये शासनाची व सदनिकाधारकांची वेळोवेळी फसवणूक केली आहे. याबाबत सदनिकाधारकांनी शासनाकडे वेळोवेळी तक्रारी निवेदने वस्तुनिष्ठ देऊनही त्या बिल्डरवर कारवाई होत नाही. पर्यायाने सदनिकाधारकांना न्याय मिळत नसल्याने शेवटचा पर्याय म्हणून ते पुन्हा आत्मदहन जिल्हाधिकारी कार्यालय,सातारा अथवा स्वतःच्या राहत्या घरी करणार आहे अशी माहिती संतोष मोहिते यांनी दिली आहे.

