कात्रज घाट माथा पीएमपीएल कामगार मित्र मंडळाकडून बनेश्वर वारकर शिक्षण संस्था व माऊली अनाथाश्रम माळेगाव यांना वस्तूरूपी मदत.

Maharashtra varta

 कात्रज घाट माथा पीएमपीएल कामगार मित्र मंडळाकडून बनेश्वर वारकर शिक्षण संस्था व माऊली अनाथाश्रम माळेगाव यांना वस्तूरूपी मदत.


नसरापूर ( प्रतिनिधी):-पत्रकार पवार.

कात्रज घाट माथा पीएमपीएल कामगार मित्र मंडळ, पुणे यांच्याकडून बनेश्वर वारकरी शिक्षण संस्था व माऊली अनाथाश्रम माळेगाव यांना अन्नधान्य, पाण्याची टाकी, शेगडी आश्रमासाठी स्वयंपाकाला लागणारी भांडी अशा विविध प्रकारच्या वस्तू देण्यात आल्या. कात्रज घाटमाथा पीएमपीएल कामगार मित्र मंडळाचे सदस्य शिवाजी रघुनाथ खुडे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत व सामाजिक बांधिलकीने व बनेश्वर वारकरी शिक्षण संस्था, माऊली अनाथ आश्रम हे आदर्श विद्यार्थी आदर्श वारकरी घडवत आहेत या त्यांच्या कामाची दखल घेत त्यांना सहकार्य व मदत करण्यात आले.


यावेळेस कात्रज घाट माथा पीएमपीएल चे संस्थापक उत्तम मोरे अध्यक्ष विलास मांगडे, कार्याध्यक्ष हरिभाऊ कोंडे ,मार्गदर्शक विश्वनाथ मांगडे, खजिनदार संदीप उर्फ आबा रांजणे, काका इंगुळकर, नंदकिशोर मांढरे ,संतोष खुडे, रोहिदास रोहित धुमाळ( सेक्रेटरी), उपाध्यक्ष लक्ष्मण ससाने, विलास गाडे ,शिवाजी खुडे ,प्रशांत महामुनी, सुनील वालगुडे, विजय पासलकर, संजय तात्या जाधव ,अधिक राव जाधव, लखन ससाने, अमित मांढरे, काळूराम कोंढाळकर, शिवाजी खुडे ,विलास गाडे आदी उपस्थित होते.


 यावेळेस या कार्यक्रमासाठी बनेश्वर वारकरी शिक्षण संस्थेचे मार्गदर्शक संतोष राव बांदल, माऊली झेंडे उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अनाथांची माय संस्थापक अध्यक्ष ह. भ  प. नवनाथ महाराज लिमण यांनी केले तर पीएमपीएल कामगार मित्र मंडळाचे अध्यक्ष विलास मांगडे यांनी मनोगत व्यक्त केले. तर या कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन प्रसिध्द निवेदक विठ्ठल पवार यांनी केले तर उपस्थितांचे आभार पीएमपीएल कामगार मित्र मंडळाचे संस्थापक उत्तम मोरे यांनी मानले.


(कात्रज घाट माता पीएमपीएल कामगार मित्र मंडळाने कायमच समाजातील उपेक्षित ,दुर्लक्षित घटकांना  मदत व सहकार्याचा हाथ दिला आहे. आगामी काळात विवाहसंस्था उभी करून सर्वधर्मीय विवाह सोहळ्याचे आयोजन करणार असल्याचे सांगितले.)

To Top