भेदाभेद मुक्त मानव मोहिमेचे एक दिवसीय लाक्षणिक उपोषण आज भोर तालुक्यातील दिवळे गावात.
भोर ( प्रतिनिधी):-
विद्यार्थी भारती संघटना ही ध्येयवादी विद्यार्थ्यांची तत्त्वनिष्ठ संघटना असून गेले 14 वर्ष विद्यार्थ्यांच्या व समाजातील विविध बुरसटलेल्या विचारधारेला छेद देण्याचं कार्य अहिंसात्मक पद्धतीने करत आली असून, समाजातील वाढत्या विषमतेला व मांसामाणसांमध्ये पाळल्या जाणाऱ्या भेदाना मुळापासून संपवण्यासाठी विद्यार्थी भारती राज्यध्यक्षा पूजा जया गणाई यांनी साताऱ्यातील वाई तालुक्यातील बोपर्डी या ठिकाणी 26 जानेवारी 2021 ते 30 जानेवारी 2021 या दरम्यान 5 दिवसांच्या कालावधीत उपोषण करून भेदाभेद मुक्त मानव या मोहिमेला सुरुवात केली असून. हे उपोषण दर महिन्याच्या 30 तारखेला वेगवेगळ्या विभागात राबवले जात असून या मार्च महिन्यात 30 तारखेला अर्थात आज पुण्यातील भोर तालुका दिवळे गाव येथे हे उपक्रम राबवत आहोत.अशी माहिती विद्यार्थी भारती राष्ट्रीय अध्यक्षा मंजिरी धुरी यांनी दिली.
माणूस म्हणून जगताना धर्म ,जाती, भाषा, वर्ण ,वर्ग, वंश, लिंग, गरीब -श्रीमंत अश्या कोणत्याही प्रकारच्या भेदांच्या आहारी न जाता माणसाला माणूस म्हणून स्वीकारले जावे अशी धारणा घेऊन ह्या मोहिमेची सुरुवात केली आहे व यासाठी जो मार्ग निवडला आहे तो अहिंसक क्रांतीचा मार्ग आहे . असे विद्यार्थी भारती राज्यध्यक्षा पूजा जया गणाई यांनी दिली.
आपल्या वैयक्तिक जीवनातही आपण अनेक भेद पाळत असतो सहज एखाद्याला त्यांच्या रंगावरून बोलणे ,उंचीवरून बोलणे, दिसण्यावरून बोलणे आपण नकळत ते सहज घेत असतो पण अनेकदा अनेकांना आपण आपल्या ह्या वृत्तीने लोकांना दुःखावत असतो. ही वृत्ती पूर्णपणे संपेल की नाही याची खात्री देणे कठीण आहे पण अनेक संवेदनशील मनं बदलतील ह्याची खात्री आहे.अशी माहिती उपाध्यक्ष संकेत साळवी यांनी दिली.
तसेच या मोहिमेअंतर्गत चित्रकला, निबंध, वक्तृत्व स्पर्धा अश्या स्पर्धाचे आयोजन केले आहे. या स्पर्धांच्या माध्यमातून विद्यार्थी भेद या संकल्पनेला कोणत्या दृष्टीने पाहतात हे पाहता येतं. अशी माहिती विद्यार्थी भारती राज्य सचिव हृतिक ताम्हणकर यांनी दिली.
तसेच ह्या उपोषणाच्या दरम्यान कथावाचन , लेखवाचन, कवितावाचन , विविध प्रकारच्या भजनाच्या व पथनाट्याच्या माध्यमातून प्रबोधन केले जाणार असून गावातील अनेक तरुणांना ह्या उपक्रमांच्या माध्यमातून आपले मनोगत व्यक्त करण्याची संधी मिळणार आहे अशी माहिती राज्य कार्याध्यक्ष साक्षी भोईर यांनी दिली.
तसेच उपोषणाचा समारोप करताना कोणत्याही प्रकारचा भेद न पाळण्याची शपथ घेत . पुढील 30 तारखेचे उपोषण हे वेगळ्या विभागात असून तेव्हाच्या उपक्रमाची माहिती लवकरच कळवली जाईल.
अधिक संपर्कासाठी
8104571787
आरती गुप्ता (राज्यकार्यवाह).


