WOM कंपनीचा दुसरा प्रोजेक्ट कासुर्डी गु. मा.येथे भूमिपूजन उदघाटन समारंभ संपन्न.

Maharashtra varta

 WOM कंपनीचा दुसरा प्रोजेक्ट कासुर्डी गु. मा.येथे भूमिपूजन उदघाटन समारंभ संपन्न.


कापूरहोळ( प्रतिनिधी) :-

WOM कंपनी या भागात उभी राहतेय. या भागातील तरुणांना  रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊन या भागाचा कायापालट होईल असे प्रतिपादन भोर वेल्हा मुळशीचे आमदार संग्राम थोपटे यांनी केले.


भोर तालुक्यातील  कासुर्डी गु. मा. येथे उद्योगपती  सुधीरजी पुराणिक  यांच्या वर्ल्डवाईड ऑइलफील्ड मशीन प्रायव्हेट लिमिटेड (WOM) या अंतरराष्ट्रीय कंपनीच्या नवीन प्रोजेक्टचा भुमिपुजन समारंभ संपन्न झाला.त्यावेळेस आमदार  थोपटे बोलत होते.

विक्रम खुटवड यांनी बोलताना सांगितले की,आज खऱ्या अर्थाने गेली तीन चार वर्षे वेळोवेळी घेतलेली मेहनत फळाला येताना दिसतेय. हा प्रोजेक्ट गुंजन मावळ खोरे आणि पर्यायाने भोर तालुक्यातील नागरिकांचे जीवनमान उंचवण्याचे काम करेल .WOM प्रोजेक्ट तरुणांना रोजगार निर्मितीसाठी अत्यंत महत्वपूर्ण ठरणार आहे . तसेच भविष्यात कंपनीच्या आसपास कंपनी प्रॉडक्ट्स संलग्न छोटे मोठे जोडधंदे निर्माण होऊन त्या मार्गाने देखील सभोवतालच्या नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी महत्वपूर्ण ठरेल.

 या वेळेस कंपनीचे मालक सुधीर पुराणिक यांचे आभार व्यक्त केले. तसेच  त्यांच्या ७७ व्या वाढदिवसाचे औचित्य साधून सरू करत असलेल्या नवीन प्रकल्पास आणि त्यांच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आणि भविष्यामध्ये सुद्धा येणाऱ्या अडी अडचणी मध्ये पूर्णपणे सहकार्य करू, असे आश्वासन दिले.

कंपनीचे मालक सुधीरजी पुराणिक यांनी आपल्या मनोगतामध्ये विक्रमदादांचे विशेष आभार मानले व सभोवतालच्या युवकांना जास्तीत जास्त रोजगार उपलब्ध करून देऊ असे आश्वासन दिले आणि येणाऱ्या काळात कंपनीच्या भरभराटी सोबत सभोवतालच्या परिसराचा पण विकास होईल अशी आशा व्यक्त केली.

यावेळी पुणे जिल्हा परिषदेचे गटनेते विठ्ठल आवाळे,कंपनीचे मालक  सुधीर पुराणिक, सौ.रेवती मॅडम, सौ. सायली मॅडम, उद्योजक सुभाषतात्या मांगडे,.बंडूशेठ गुजराथी-प्रमुख भोर व्यापारी संघ,कंपनी प्रशासनातील सर्व पदाधिकारी , कासुर्डी (गु. मा.) च्या   सारिकाताई शांताराम मालुसरे व सर्व ग्रामपंचायत सदस्य, बारामती लोकसभा मतदार संघाचे संपर्क प्रमुख व विक्रमदादा खुटवड युवा मंचाचे अध्यक्ष  समीर धुमाळ, उपाध्यक्ष व WOM कंपनीचे एम्प्लॉयी  गणेश मालुसरे,  शांतारामबापू मालुसरे ,अंकुश मालुसरे,  संतोष मालुसरे, प्रदीप मालुसरे,  विकास मालुसरे, सचिन सोंडकर, राहुल गाडे  तसेच मौजे कासुर्डी ग्रामस्थ, कार्यकर्ते इ.उपस्थित होते.

To Top