नवविकास शेतकरी संघटनेच्या वतीने महिलांचा सन्मान
नसरापूर (प्रतिनिधी)
नवविकास युवक शेतकरी संघटनेच्या वतीने गेले सहा वर्षापासून विविध क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या महिलांचा जागतिक महिला दिनानिमित्त सन्मान सोहळा आयोजित केला जातो. या वर्षी संघटनेच्या वतीने कोरोना च्या काळात भरीव कामगिरी करणाऱ्या कृषी आरोग्य आणि शेती क्षेत्रातील काम करणाऱ्या महिलांचा सन्मान करण्यात आला. सोनाली रमेश कादबाने माधुरी दिघे ,साधना जगता,प सोनाली चव्हाण ,प्रीती मोरे कृषी विभाग नसरापुर डॉ. स्वाती मोहिते विभाग प्रमुख भारती हॉस्पिटल पुणे, डॉ नम्रता तांबे, डॉ सुनीता ओकार थोपटे अपेक्स डायना स्टिक सेंटर कात्रज, छाया विश्वास मारणे आरोग्य सेविका खोपी, रंजना नारायण जगताप कृषी उद्योजिका खोपी , वर्षा राजेंद्र दळवी पोलीस पाटील शिवरे यांना आदर्श महिला पुरस्काराने गौरविण्यात आले.
पुरस्काराचे स्वरूप सन्मान चिन्ह सन्मानपत्र शाल, एक झाड देण्यात आले. गेल्या एक वर्षापासून कोरोनामुळे संपूर्ण जग थांबले असताना या महिलांनी आपल्या कुटुंबाची काळजी घेत आपल्या जिवाची पर्वा न करता समाजाची काळजी आपल्या कुटुंबाप्रमाणे घेतली त्यामुळे संघटनेच्या वतीने या आदर्श महिलांना पुरस्काराने गौरविण्यात आले असे मत संस्थापक अध्यक्ष दादासाहेब पवार यांनी व्यक्त केले.

