करंदीच्या उपसरपंचपदी मनोजआबा बोरगे.
नसरापूर( प्रतिनिधी) :पत्रकार पवार.
करंदी खे.बा. ग्रामपंचायतीची झालेल्या मासिक बैठकीत उपसरपंचपदी मनोज आबा बोरगे यांची बिनविरोध निवड करण्यात आली
मागील काही दिवसापूर्वी करंदीच्या उपसरपंच अंकिता रुपेश गायकवाड यांनी उपसरपंच पदाचा कार्यकाळ पूर्ण करत ठरल्या प्रमाणे आपल्या उपसरपंच पदाचा राजीनामा दिला होता. त्यानुसार आज (दि.23 )बैठकीत बोरगे यांची बिनविरोध निवड झाली.
यावेळेस करंदी खे बा.च्या सरपंच अलका तळेकर मा.उपसरपंच अंकिता गायकवाड सदस्य रोहिणी गायकवाड,अश्विनी कापरे ,सायली बोरगे,सदस्य सचिन मस्के ग्रामसेवक परमेश्वर गोमसाळे उपस्थित होते.
यावेळेस उपसरपंच पदी निवड झाल्याबद्दल मनोज आबा बोरगे यांचे अभिनंदन मा. सरपंच अरविंद बोरगे,युवा उद्योजक रणजीत बोरगे,उद्योजक विशाल भाऊ शिंदे, भोर तालुका युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुलदादा बोरगे, परशुराम बोरगे, महेश खाटपे निखील खाटपे, रवींद्र मांढरे, शैलेश बोरगे, प्रकाश मस्के ,माऊली गायकवाड,हरिआबा खाटपे आदींनी अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या.



