पुरंदर तालुका प्राथ. शिक्षक सह. पतसंस्थेची ऑनलाईन सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न ..
सभासदांना कमाल कर्जमर्यादा 50 लाख आणि सभासदाना 20 लाख रुपये विमाकवच इत्यादी महत्वाचे निर्णय.
सासवड (प्रतिनिधी):-
पुरंदर तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेची वार्षिक ऑनलाईन सर्वसाधारण सभा मोठया उत्साहात पार पडली. या सभेत सभासदासाठी कमाल कर्ज मर्यादा 25 लाखावरून 50 लाख तर सभासद कर्ज संरक्षण ठेव म्हणजे विमा 10 लाखावरून 20 लाख रुपये करत सभासदांना आपल्या खात्याची अद्ययावत माहिती मिळणेसाठी अँड्रॉइड अॕपची निर्मिती करण्यासंबंधी महत्वाचे निर्णय घेण्यात आल्याची माहिती सभापती वसंत कामथे आणि मानद सचिव गणेश कामठे यांनी दिली.
तब्बल साडेतीन तास चाललेल्या या सभेत कार्यकारी मंडळाच्या पारदर्शी आणि काटकसरीच्या कामाचे सभासदांनी कौतुक केले . गतवर्षी संस्थेला 2 कोटी 85 लाख 73 हजार इतका नफा झाल्याने, गतवर्षी सभासदाना 12.50 % इतका विक्रमी डिव्हिडंड दिला आहे. संस्थेचे 800 सभासद असून, भागभांडवल 26 कोटी आहे. संस्थेकडे 6 कोटींपेक्षा जास्त रुपयांच्या ठेवी असून 30 कोटी रुपये कर्ज वाटप करण्यात आले आहे. कर्जाचे व्याजदर कमी करून 10.50% इतका केला आहे, आवर्ती ठेव आणि मुदतठेवीला 10.50 इतका व्याजदर आहे. या वार्षिक सभेत झालेल्या सर्व निर्णयांचे सभासद बंधू भगिनी आणि जुनी पेन्शन हक्क संघटनेने स्वागत केले असल्याची माहिती उपसभापती सुनील कांबळे यांनी या वेळी दिली.
सभेसाठी संचालक संदीपआप्पा जगताप , सुनील लोणकर , रविंद्र जाधव , अविराज शिंदे , यशवंत दगडे , सतीश कुंजीर , अनिल जगदाळे , अलका रासकर , संगीता म्हेत्रे , सलीम मणेर , बाळासाहेब कुंजीर , वर्षा खळदकर , सुरेश लांघी ,संजय जमदाडे , संजय कुंजीर हे उपस्थित होते.
स्वागत वसंत कामथे यांनी , अहवाल वाचन गणेश कामठे यांनी तर आभार सुनील कांबळे यांनी मानले .

